दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड,
दौंड ता,०६ जुलै २०२३,दौंड तालुक्यातील पश्चिम भागात बोरीभडक प्रादेशिक जलजीवन मिशन नळ पाणी पुरवठा योजना अंदाजे ३० कोटी रुपये खर्चाची असून या योजनेची नेमकी मागणी कोणी केली, आशा प्रकारचा सवाल,? बोरीभडक , डाळिंब, ताम्हणवाडी आणि बोरिऐंदी येथील सरपंच यांनी उपस्थित करून या योजनेस आमचा विरोध असल्याचे स्पस्तपणे सांगितले आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण,विभाग क्र, १ पुणे यांचे वतीने कविता बोरीभडक प्रादेशिक जलजीवन मिशन नळ पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे, बोरीभडक डाळिंब, ताम्हणवाडी आणि बोरिऐंदी या चार गावासाठी ३० कोटी ९२ लाख ५५ हजार ४३१, रुपये खर्चाची ही योजना आहे.
विशेष बाब अशी की ही योजना मंजूर होऊन कंत्राटदार याने गावोगावी लोखंडी पाईप आणून टाकलेवर सरपंच चौकशी करू लागले, आम्ही तर या योजनेची मागणीच केली नाही, मग ही योजना मंजूर कशी व कोणाच्या मागणीने झाली, असा स्पस्ट सवाल डाळिंबाचे सरपंच बजरंग म्हस्के, बोरी भडकच्या सरपंच कविता बाळासाहेब कोळपे, बोरिऐंदी च्या सरपंच सविता मंगेश भोसेकर, ताम्हणवडीच्या सरपंच श्वेता अभी ताम्हाणे यांनी उपस्थित केला आहे.
ही योजना शेलारवाडी तलावातून करण्यात येणार असून तलाव ते गाव अंतर १३ कि,मी, आहे, या योजनेचा वार्षिक देखभाल दुरुस्ती कामगार आणि वीज खर्च वर्षाला ४५ लाख रुपये दाखवला असून प्रत्येक गावाला ११ लाखच्या वर येणार आहे.
विशेष म्हणजे या गावाच्या नळ पाणी पुरवठा योजना या मुळामुठा कालव्यावर आधारित असल्याने पाणी योग्य प्रमाणात मिळत आहे,या योजना आणि त्या योजनेचा देखभाल दुरुस्ती खर्च या ग्रामपंचायती करीत आहेत,
असे असताना अवाढव्य खर्चअसणारी ही योजना गावची मागणी नसताना बळेच माथी मारण्याचे कारण काय ?
योजनेचा अवाढव्य खर्च, त्या योजनेचे कर्ज फेड हप्ते आणि देखभाल दुरुस्ती खर्च भागवण्यासाठी गावे अडचणीत येतील, ग्रा पंचायतीचे अर्थ कारण विस्कळीत होईल.
$ योजना नेमकी कोणासाठी ? गावांची पाणी योजना व्यवस्थित योग्य प्रमाणात पाणी मिळत असताना आणि या बिग बजेट योजनेची या चारही गावात मागणी केली नसताना ही योजना मंजूर कशी झाली, असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे, ही योजना त्या योजनेच्या अधिकारी, कंत्राटदार, आणि पुढारी की आणखी कोणाच्या आर्थिक लाभासाठी अशी जोरदार चर्चा या चारही गावातून सुरू झाली आहे.
योजनेला गावकऱ्यांचा कट्टर विरोध होत असुन देखील, व आमची मागणी नसताना आमच्या माथी मारू नये, या योजनेस आमचा कट्टर विरोध असल्याचे ग्रामसभेत ठराव घेऊन तसे लेखी संबधीत खात्यास दिले आहे, त्या अनुषंगाने $ योजना मान्य नसेल तर रद्द करण्यात येईल, या योजने बाबत चारही गावाच्या सरपंच आणि संबधीत अधिकारी यांची आमदार राहुल कुल यांनी दौड येथे मिटिंग घेतली, सरपंच आणि प्रमुख कार्यकर्ते यांची मते ऐकल्यावर सदर योजनेस गावचा विरोध असेल तर ही योजना रद्द करण्यात येईल, असे आमदार राहुल कुल यांनी सांगितले आहे.
कंत्राटदारांची मनमानी, योजना राबवू द्या,सदर योजना अंदाजे ३१ कोटी ची आहे, यामध्ये फार मोठा आर्थिक लाभ मिळणार आहे, काहीही करून ही योजना सरपंच व ग्रामस्थ यांनी करू द्यावी, यासाठी या योजनेचा कंत्रायदार सर्वते प्रयत्न करत आहे, विशेषतः आर्थिक आमिष दाखवू लागला आहे, आणि यामध्ये पोट कंत्राटदार असलेले जि.प. सदस्य पंचायत समिती सदस्य, सरपंच विरोधी गट सहकार्य करू लागले असल्याची जोरदार चर्चा आहे.
गावकऱ्यांच्या दृष्टीने पुढील काळात पाणी टंचाय होण्याची शक्यता नाकारता येत नाही, मात्र स्थानिक पातळीवर सरपंच व ग्रामस्थांचा विचार विनिमय घेऊन अंतिम निर्णय घ्यावा अशी अपेक्षा नागरिकांमध्ये व्यक्त केली जात आहे.
माजी सरपंच याचा खोडसाळ पणा आज ही ताम्हणवाडी येथे भरपूर पाणी मिळते, पोट कंत्राटदार असलेल्या येथील एका माजी सरपंच याने, पाण्याची तीव्र टंचाई, पाण्यासाठी वन वन अशी खोडसाळ बातमी एक पेपरला दिली, शेवटी त्याचेच पितळ उघडे पडले आहे
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.