यवत ग्रामस्थांनी वन भोजनाची जपली परंपरा, संपुर्ण गाव कडकडीत बंद, कुटुंबासह ग्रामस्थांचे गावाबाहेर भोजन

By : Polticalface Team ,10-07-2023

यवत ग्रामस्थांनी वन भोजनाची जपली परंपरा, संपुर्ण गाव कडकडीत बंद, कुटुंबासह ग्रामस्थांचे गावाबाहेर भोजन दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, दौंड ता ०९ जुलै २०२३ यवत ता दौंड जिल्हा पुणे येथील, ग्रामस्थांनी पूर्वकालीन परंपरा जपण्याचा प्रयत्न केला, आखाड सप्ताहात पहिल्या रविवारी वन भोजनाचा पारंपारिक कार्यक्रम करण्यात आला होता. या निमित्ताने गावातील सर्व ग्रामस्थ कुटुंबासह वन भोजनासाठी गावाबाहेर नैसर्गिक स्थळी जाऊन वन भोजन करण्याची परंपरा आज ही कायम आहे, रविवार दि,०९ जुलै २०२३ रोजी वन भोजन कार्यक्रम करण्यात आला होता, या निमित्ताने यवत गावातील ग्रामस्थांच्या उपस्थितीत ग्रामदैवत लक्ष्मी आई देवीचा पोतराज गोंधळी यांच्या पारंपरिक वाद्यांच्या गजरात ग्रामदैवत लक्ष्मी आई देवीचा छबिना गाव प्रदक्षिणा करत देव पुजा आरती करुन, मोठ्या उत्साहात काढण्यात आला, वन भोजनाच्या निमित्ताने संपूर्ण गावातील ग्रामस्थ कुटुंबासह घराला कुलूप लावून, सकाळीच घराबाहेर जाऊन दुपारचे भोजन नैसर्गिक स्थळी घेण्याचा आनंद व्यक्त केला, तसेच गावातील सर्व व्यापारी वर्ग वन भोजनाच्या निमित्ताने उद्योग व्यवसाय दुकानदारी बंद करून पूर्वकालीन परंपरा जपण्याचा प्रयत्न केला, वन भोजनाच्या दिवशी गावातील बाजार पेठ व येशी मध्ये कोणतेही वाहन सायकल टु व्हीलर फोर व्हीलर फीरु नये याची दक्षता घेण्यात आली होती, यवत गावात पुर्वी मरीआईचा गाडा गावातुन फिरविण्याची परंपरा होती,असे बोलले जात आहे, त्यामुळे गावातील रोग राई दुर करण्यासाठी व विविध आजार व साती पासून नागरिकांची सुरक्षा होण्या बाबत उपाय योजना राबविण्यात येत असल्याचे वय वृद्धांकडून बोलले जाते, या परंपरे मागे पूर्वकालीन संस्कृती असल्याचे दिसून येते, अध्यात्मिक स्वरुपात पृथ्वी,आप, तेज, वायु आकाश, ह्या (पंचतत्व) नैसर्गिक निसर्ग देवतेची पूजा करण्यात येते असल्याचे बोलले जात असे, मात्र कालांतराने मानवाने उच्चांक करुन, पूर्वकालीन असलेल्या लोक कल्याणकारी सत्कर्म जोपासण्याचे अतिशय महत्त्वाची भूमिका घेऊन परंपरा कायम रुजविण्याचा पाईडा यवत गावातील नागरिक जपत आहेत. निर्गुण निराकाराची ओळख आध्यात्मिक परंपरेचा लोप दिवसान दिवस होत चालला असल्याचे दिसून येत आहे, निर्गुण निराकार सगुण साकार, आध्यात्मिक गुरू परंपरा या मागे संतांचा उपदेश असल्याचे सांगत, जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाचा दाखला दिला जात आहे, (वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे) तुका म्हणे माझी भाक जन्म नाहिरे अनेक,,, याची देही याची डोळा पाहिलं मुक्तीचा सोहळा,,, मनाचा मारु न करता परी इंद्रियासी दुःख न देता मोक्ष आहे आयता श्रवण माझे,,, चाले हे शरीर कोणाचीया सत्ते कौन बोलवितो हरि विना, यवत ता दौंड जिल्हा पुणे येथील वन भोजनाच्या निमित्ताने संवाद साधण्याचा प्रसंग आला, असल्याचे अध्यात्मिक साधक विष्णुपंत बोडके यांनी सांगितले या प्रसंगी श्री काळभैरवनाथ देवस्थान कमिटीचे अध्यक्ष मा सतीश दोरगे, यवत ग्रामपंचायतीचे मा उपसरपंच व विद्यमान सदस्य सदानंद दोरगे, कमिटीचे सदस्य कैलास आबा दोरगे, दत्तात्रय दोरगे, वि का सो मा चेअरमन आण्णा दोरगे, श्रीपतीराव दोरगे, कोंडीबा दोरगे, काळुराम शेंडगे, सागर शेंडगे, आदी मान्यवर उपस्थित होते.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.