दौंड गोपाळवाडी शिबिरात १८३ तरुणांनी केले रक्तदान, शरीर सुदृढ आणि निरोगी जीवन जगण्यासाठी रक्तदान आवश्यक, दौंड पोलीस अधिकारी स्वप्निल जाधव

By : Polticalface Team ,10-07-2023

दौंड गोपाळवाडी शिबिरात १८३ तरुणांनी केले रक्तदान, शरीर सुदृढ आणि निरोगी जीवन जगण्यासाठी रक्तदान आवश्यक, दौंड पोलीस अधिकारी स्वप्निल जाधव दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, दौंड,ता १० जुलै २०२३, दौंड तालुक्यातील मौजे गोपाळवाडी येथे रोटरी क्लब ऑफ दौंड, रोट्रक्ट् क्लब कॉलेज आणि गोपाळवाडी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याचे विठ्ठल होले यांनी सांगितले, या शिबिरात १८३ रक्त दात्यानी रक्तदान केले असुन मौजे गोपाळवाडी ता दौंड जिल्हा पुणे येथे शनिवार दि,०८/०७/२०२३ रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते, या प्रसंगी मौजे गोपाळवाडी व दौंड तालुक्यातील युवा तरुणांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता, दौंड उपविभागीय पोलीस अधीक्षक स्वप्निल जाधव यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले, गोपाळवाडी रक्तदान शिबिरात सहभागी झालेल्या १८३ रक्तदात्याना सुरक्षा कवच हेल्मेट, सर्टिफिकेट तसेच एक झाड (रोप) वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले, या प्रसंगी रक्तदान केल्याने शरीरात अधिक वाढ होऊन तंदुरुस्त पणा निर्माण होतो, तरुणांनी पुढाकार घेऊन शरीर सुदृढ व निरोगी जीवन आरोग्यासाठी रक्तदान शिबिरात सहभागी होऊन शरीर हेल्दी ठेवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे दौंड पोलीस उपविभागीय अधिकारी स्वप्निल जाधव यांनी उपस्थित युवा तरुणांना मार्गदर्शन करताना सांगितले, तसेच डॉ, वाघमोडे यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले रक्तदान ही काळाची गरज आहे तरुणांनी ती ओळखली पाहिजे, या समाज उपयोगी चांगल्या कार्याला कोणत्याही मुहूर्ताची किंवा निमित्ताची आवश्यकता नसते हे आज विठ्ठल होले,आणि होमल सरांनी सिद्ध केले आहे, कोणतेही कारण पुढे न करता थेट रक्तदान शिबिराचे आयोजन केले, ही अतिशय कौतुकास्पद बाब आहे, डॉ वाघमोडे यांनी स्वतः रक्तदान करून मोलाचा संदेश दिला असुन आयोजकांचे आभार व्यक्त केले, या वेळी योगायोगाने राम होले, व नाना शिंदे, या युवा तरुणाचा वाढदिवस त्यांनी रक्तदान करून साजरा केला, या शिबिरासाठी रोटरी ब्लड बँक चे रविंद्र फडतरे, नारायण पाटील, आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे सहकार्य मिळाले असल्याचे आयोजकांनी सांगितले, तसेच रोटरी क्लब ऑफ दौंड अध्यक्ष सविता मनोहर भोर सेक्रेटरी दीपक सोनवणे रोटरॅक्ट क्लब ऑफ दौंड कॉलेज अध्यक्ष प्रज्वल बांडे सेक्रेटरी हेमांगी बंब, माजी सचिव अमीर शेख, तसेच रोटरी क्लबचे सर्व पदाधिकारी सहकारी,यांचे मोलाचे सहकार्य लाभले असुन रोटरी क्लब ऑफ दौंड, रोट्रक्ट् क्लब कॉलेज दौंड आणि गोपाळवाडी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले असल्याचे आयोजकांनी सांगितले, या वेळी एस आर पी, ग्रुपचे जवान, दौंड पोलीस कर्मचारी श्रीगोंदा मनसे तालुका उपाध्यक्ष सतीश पाचपुते, काष्टी,श्रीगोंदा, निमगाव खलु, दौंड, पाटस, गोपाळवाडी, दौंड पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल जाधव, उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक दत्तात्रय वाघमोडे, मिशन हॉस्पिटल चे पवार सर,राष्ट्रवादी काँगेस तालुका अध्यक्ष आप्पासाहेब पवार, प्रविण परदेशी, बागल सर, हरिभाऊ ठोंबरे,पो हवा नंदकुमार केकान, विजय पवार, अँड कावेरी गुरसाळ, अँड रुपाली सदगर, मिसबा सय्यद, श्वेता रायकर छायाताई बबनराव लव्हे,उपसरपंच जयसिंग दरेकर, शिवाजी पवार, तंटामुक्ती अध्यक्ष भिमा चोरमले, राजेंद्र दोरड, वनविभाग अध्यक्ष सागर गिरमे, तसेच ग्रामस्थ व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते, या वेळी रक्तदान शिबिराचे आयोजक विठ्ठल होले आणि नागेश होलम सर यांचा, दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, कार्यक्रमाचे प्रास्ताविक विठ्ठल होले यांनी केले तर सूत्रसंचालन रवि पवार, आणि किशोर टेकवडे यांनी केले, होलम सर यांनी या रक्तदान शिबिरामध्ये सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त केले
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष