मौजे यवत येथील डवरी गोसावी समाजातील एका कुटुंबाला, जात पंचायतीच्या पंचांनी वाळीत टाकुन केला बहिष्कार, ०९ पंचाविरुद्ध यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल

By : Polticalface Team ,12-07-2023

मौजे यवत येथील डवरी गोसावी समाजातील एका कुटुंबाला, जात पंचायतीच्या पंचांनी वाळीत टाकुन केला बहिष्कार, ०९ पंचाविरुद्ध यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, दौंड ता,१२ जुलै २०२३ यवत पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे यवत इंदिरा नगर ता दौंड जिल्हा पुणे येथील शोभाबाई राजाराम शिंदे व त्यांच्या कुटुंबातील सर्व लोकांना, डवरी गोसावी समाज जात पंचायतीच्या पंचांनी बहिष्कार टाकुन व दंडात्मक रक्कम ठेवून (वाण) वाळीत टाकले असल्याचा बेकायदेशीर प्रकार समोर आला आहे, या संदर्भात पीडित कुटुंबातील फिर्यादी, शोभाबाई राजाराम शिंदे, वय ५५ वर्ष जात हिंदू नाथपंथी डवरी गोसावी, रा यवत इंदिरा नगर ता दौंड जिल्हा पुणे, यांच्या तक्रारीवरून यवत पोलीस स्टेशन येथे दि,११/०७/२०२३ रोजी, गु र न, ७७३/२०२३ भा द वि,क,५०७ सामाजिक बहिष्कारा पासून व्यक्तीचे संरक्षण अधिनियम कलम ५-६ अंन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, यवत इंदिरा नगर ता दौंड जिल्हा पुणे येथील राहत्या घरी दि,०२/०४/२०२३ रोजी दुपारी ४; वाजे दरम्यान डवरी गोसावी समाजातील पंच आरोपीचे नांव:१) मोहन भगवान चव्हाण मु.पो.आरोळी वस्ती, जामखेड, ता. जामखेड जि.अहमदनगर (प्रमुख पंच) २)नारायण अर्जुन सांवत रा. ब्राम्हणी, ता.राहुरी जि.अहमदनगर (प्रमुख पंच) यांनी ३)भगवान शंकर चव्हाण ४) भाऊराव सिताराम शिंदे ५) रणजित मोहन चव्हाण सर्व रा. मु.पो. आरोळीवस्ती, जामखेड, ता. जामखेड जि.अहमदनगर (पंच) ६) तानाजी अर्जुन सांवत ७) नाथा अर्जुन सांवत ८) नामदेव अर्जुन सांवत सर्व रा. ब्राम्हणी, ता.राहुरी जि.अहमदनगर (पंच) ९) गंगाराम रावजी चव्हाण रा.हांडीनिमगाव ता.नेवासा जि. अहमदनगर, दि,०२/०४/२०२३ रोजी सकाळी ११:०० वाजे ते दुपारी ४:०० वाचे दरम्यान मौजे यवत ता. दौंड जि. पुणे गावचे हददीत इंदीरा नगर येथे फिर्यादीच्या राहते घरासमोर डवरी गोसावी समाजांतील जात पंचायतीचे कारभारी इसम नामे १) मोहन भगवान चव्हाण २) नारायण अर्जुन सांवत यांना फिर्यादीने दोन मुलीचे लग्न जमविण्यासाठी ८० हजार रुपये दिले होते, मात्र डवरी गोसावी समाजातील पंच मोहन भगवान चव्हाण व नारायण अर्जुन चव्हाण, यांनी नवरदेव न पाहिल्यामुळे त्यांना दिलेले ८० हजार रुपये फिर्यादीने परत मागितलेच्या कारणा वरून, त्यांनी डवरी गोसावी समाजातील जात पंचायतीच्या लोकांना व इतर पंचाना एकत्रित बोलवून जात पंचायत भरवुन त्यामध्ये फिर्यादी शोभाबाई राजाराम शिंदे व त्यांच्या कुटुंबा विरुद्ध बनाव करून अपमानास्पद वागणूक देऊन अन्यायकारक बेकायदेशीर बहिष्कार टाकत दंडात्मक रक्कम लादण्यात आली असल्याने तसेच (पंच) आरोपींनी जात पंचायतीमध्ये विडा उचलून, १२ रु, १ रु, ५ रु, २५ रु,६० रु, ३५० रु, असे ऐकून ४५३ रु, दंड करुन, फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांना वाण (वाळीत)टाकलेच्या कारणावरून तसेच डवरी गोसावी समाजातील जात पंचायतीच्या पंचांनी भारतीय राज्यघटनेतील कायदा व सुव्यवस्थेचा अनादर करुन, जाती रूढी परंपरा रुजवण्याचा घाट असल्याने फिर्यादीच्या तक्रारीवरून जात पंचायतीचे कारभारी पाटिल व पंच आरोपी विरुद्ध यवत पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली, कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे, दाखल अंमलदार पोना जाधव, अंमलदार पोहवा नगरे पुढील तपास करीत आहेत.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष