श्रीगोंदा प्रतिनिधी:-
तालुक्यातील नदीपट्टीतील असणारे गार ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्याकडून सेवा गौरव पुरस्कार कार्यक्रम करण्यात आला. गार गांवच्या सौभाग्यवती मनीषा योगेश मगर यांची श्रीगोंदा तालुका मार्केट कमिटीच्या उपसभापती निवड झाल्याबद्दल त्यांचे सत्कार करण्यात आला. तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गार येथे शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षिका मुख्याध्यापिका या पदावर चौदा वर्षे कार्य केलेल्या सौ पिंपळकर मॅडम यांचा सेवा गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला तसेच ग्रामपंचायत गार येथे ग्रामसेवक या पदावर सहा वर्ष कार्य केल्याबद्दल श्री कांबळे भाऊसाहेब यांना हि सेवा गौरव पुरस्कार देण्यात आला यावेळी शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते . कार्यक्रमाच्या वेळी पिंपळकर मॅडम व कांबळे भाऊसाहेब बोलत असताना त्यांचे दोघांचे मन गहिवरून आले कारण एवढ्या छोट्या गावात आम्हाला एक कुटुंबासारखे वागणूक मिळाली तसेच या गावातील लोकांनी आम्हाला सहकार्य केले केले.त्यावेळी शाळेतील असणारे विद्यार्थी व पालक यांचे डोळे भरून आले.
कार्यक्रमाचे सत्कार श्री शि.ना.नागवडे सहकारी साखर कारखान्याचे मा.व्हाईसचेअरमन श्री केशभाऊ मगर व गोरख मगर यांच्या हस्ते सेवा गौरव पुरस्कार देण्यात आला. कार्यक्रमाचे सरपंच सौ.अलकाताई देशमुख उपसरपंच अनिल खरात श्रीकांत मगर माजी सरपंच सदाशिव जाधव बबन दादा सूर्यवंशी आबासाहेब शिपलकर हरिभाऊ शेळके शिक्षक, इतर ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अशोक मचाले यांनी केले व आभार संतोष देशमुख यांनी केले.
वाचक क्रमांक :