कायद्याच्या रूपाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महिलांना कवच कुंडल :- संभाजी आप्पा बोरुडे.
By : Polticalface Team ,12-07-2023
श्रीगोंदा प्रतिनिधी :-
ग्रामीण विकास केंद्र व कोरो इंडिया मुंबई यांच्यामार्फत चालविले जाणारे सावित्री महिला समस्या निवारण व कायदेविषयक सहाय्यक केंद्र श्रीगोंदा तालुक्यातील महिलांवर होणारा अन्याय अत्याचार नुसार श्रीगोंदा तालुक्यातील महिलांना एकत्रित करून महिलांच्या कायदेविषयक एडवोकेट संभाजी आप्पा बोरुडे यांनी दोन सत्रामध्ये महिलांना कायद्याचे मार्गदर्शन केले तसेच महिलांनी जी गोष्ट आपण कधीच पाहिलेले नाही अशा गोष्टीवर आपण किती विश्वास ठेवावा याबाबत विचार करावा प्रत्येक ठिकाणी श्री आणि पुरुष यामध्ये भेदभाव का तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यामुळे व संविधानामुळे महिला सुरक्षित राहु लागल्या तसेच महिलांवर होणाऱ्या अन्याय अत्याचारासाठी शासनाने प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात एक एक संरक्षण अधिकारी यांची नेमणूक पंचायत समिती या ठिकाणी केलेली आहे ज्या महिलांवर अन्याय अत्याचार होईल त्या महिलांसाठी मोफत केस दाखल करण्यासाठी या संरक्षण अधिकारी यांची नेमणूक प्रत्येक तालुक्यात व जिल्ह्यात केलेले आहे. असे श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे कन्हेरे यांनी महिलांना d v अॅक्ट कायद्याची माहिती देताना सांगितले आहे.
तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना संविधानाच्या कायद्यानुसार महिलांना कायद्याचे कवच कुंडल दिले आहे कायद्यात महिला पुरुष यांना समुपदेशन करणारे अधिकाऱ्यांची मोठी जबाबदारी यांच्यावर सोपवलेली आहे तसेच सर्व महिलांना आपल्यावर होणाऱ्या अत्याचाराचे तक्रार ही लेखी स्वरूपात संरक्षण अधिकारी पंचायत समिती यांना लिहून देऊ शकता असे adv संभाजी आप्पा बोरुडे यांनी एकदिवसीय महिलांच्या कायदेविषयक कार्यशाळेत बोलताना सांगितले आहे.
तसेच महिलांचा कायदा 498 व अॅक्ट या विषयावर तसेच पोस्को या कायदेविषय adv संभाजी आप्पा बोरुडे व रोहिणी जगताप यांनी महिलांना सांगितले.
ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी ग्रामीण विकास केंद्र व कोरो इंडिया यांच्यामार्फत चालवण्यात आलेले सावित्री महिला समस्या व कायदेविषयक सहाय्यक केंद्र श्रीगोंदा या ऑफिसचे समन्वयक बापूसाहेब ओहोळ सचिन भिंगारदिवे तसेच पल्लवी शेलार ममता पावरा लता सावंत रोहिणी राऊत उज्वला मदने सुनीता बनकर व तसेच श्रीगोंदा तालुक्यातील महिला कविता सीधनकर मीना मोहिते गिरजा मोहिते रेणुका जगताप भावना झेंडे वैजंता झेंडे मुमताज मुलानी सारिका गोंडे छाया रसाळ रूपाली रंधवे अश्विनी जगधने तसेच या एक दिवशीय कार्यशाळेचे उद्घाटक बापू माने शिवप्रसाद उबाळे विजय शेंडे आदी उपस्थित होते.
वाचक क्रमांक :