श्रीगोंदा पोस्ट ऑफिस ची इमारत पडण्याच्या मार्गावर पोस्टल कर्मचारी व नागरिकांच्या जीवाला धोका
By : Polticalface Team ,12-07-2023
श्रीगोंदा तालुका प्रतिनिधी
श्रीगोंदा नगर परिषदेने एक वर्षापूर्वीच ही इमारत धोकादायक इमारत म्हणून जाहीर केली असून तशी नोटीस अहमदनगर विभागीय कार्यालय यांना दिली असताना सुद्धा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कुठल्याही प्रकारची कार्यवाही न करता ऑफिस स्थलांतर केलेले नाही या ऑफिस मधील कर्मचाऱ्यांना पिण्याची पाणी संडास बाथरूम अशी कुठल्याही सुविधा उपलब्ध नाही तसेच या कर्मचाऱ्यांना लघुशंकेसाठी एक किलोमीटर दूर बस स्टॅन्ड किंवा नगर परिषदेच्या सार्वजनिक सौचालयामध्ये जावे लागते या ऑफिसमध्ये काम करणारे सर्व कर्मचारी अतिशय सहकार्याने येणाऱ्या नागरिकांना सर्व सुविधा पुरविण्याचा प्रयत्न करतात परंतु या ऑफिस मधील कर्मचाऱ्यांनाच बसण्यासाठी तुटलेल्या खुर्च्या डोक्यावरती गळणारे छत अशी अवस्था असून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना सुद्धा या इमारतीपासून जीवितास धोका आहे वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कोणत्याही प्रकारचा सकारात्मक प्रतिसाद दिला नाही
वाचक क्रमांक :