राज्यातील मुस्लिम समाज व दलित समाजावर होणाऱ्या अंन्याया विरोधात वंचित बहुजन आघाडीचा बाईक रॅली काढून, दौंड तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा

By : Polticalface Team ,13-07-2023

राज्यातील मुस्लिम समाज व दलित समाजावर होणाऱ्या अंन्याया विरोधात वंचित बहुजन आघाडीचा बाईक रॅली काढून, दौंड तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, दौंड ता १२ जुलै २०२३, देश व राज्य पातळीवर मुस्लिम समाज व दलित समाजावर वाढलेल्या अंन्याय अंत्याचाराला खिळ बसण्या बाबत, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशान्वये, प्रदेश अध्यक्ष यांचे दि.२१/०६/२०२३ रोजी दिलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने दौंड तालुका वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष अश्विन वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली मुस्लिम समाज व दलित समाजावर होणाऱ्या अन्याया विरोधात दौंड तहसील कार्यालय येथे दि.१२/०७/२०२३ रोजी धडक मोर्चा चे आयोजन करण्यात आले होते, दौंड शहरातील ईदगाह मैदान खाटीक गल्ली ते तहसील कचेरी पर्यंत बाईक रॅली काढून निषेध मोर्चा काढण्यात आला, या प्रसंगी मुस्लिम व दलित समाजातील युवा तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते, दौंड शहरातील संत मदर तेरेसा, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, राष्ट्रीय संत गाडगेबाबा या महापुरुषांच्या पुतळ्यास मुस्लिम व दलित समाजातील मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून, शहरातुन बाईक रॅली काढत सकाळी १० वाजे सुमारास मोर्चाला सुरुवात करण्यात आली होती, दौंड तहसील कार्यालय समोर मोठ्या संख्येने मुस्लिम व दलित समाजातील कार्यकर्त्यांनी, होणाऱ्या अन्याया विरोधात निदर्शने करण्यात आली, दौंड तहसीलदार मा अरुण शेलार, नायब तहसीलदार भोंग यांनी दौंड तालुका वंचित बहुजन आघाडीचे निवेदन स्वीकारून वरीष्ठ अधिकारी यांच्या दालनात पोहचवण्याचे आश्वासन तहसीलदार अरुण शेलार यांनी मुस्लिम व दलित कार्यकर्त्यांना दिले, निवेदनाच्या अनुषंगाने, बीड जिल्ह्य परळी येथील जरीन खान, या संशयीत मुस्लिम व्यक्तीचा मृत्यू झाला, तसेच अक्षय भालेराव नांदेड प्रकरण, तळेगाव येथील डी वाय पाटील महा विद्यालयातील डॉ,अलेक्झांडर,या ख्रिश्चन समाजातील प्राध्यापकास मारहाण झाली असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे, मुस्लिम समाज व दलित समाजावर होणाऱ्या अन्याय विरोधात वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष अश्विन वाघमारे यांनी मनोगत व्यक्त केले, मुस्लिम व दलित समाजाने एकत्रित येऊन अन्याया विरुद्ध लढण्याचे आवाहन करत म्हणाले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व राज्याचे गृहमंत्री यांनी सदर प्रकरणी गंभीर दखल घेऊन, मुस्लिम व दलित समाजावरील होत असलेल्या अन्याय अत्याचारा विरुद्ध गांभीर्याने दखल घेऊन कायदेशीर मार्गाने गुन्हेगारां विरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली, मुस्लिम समाज व दलित समाजावर होणारा अन्याय थांबविण्या बाबत,केंद्र व राज्य शासनाने उपाययोजना आखाव्यात, ज्या सणातनी संघटना देशात दंगली घडवण्याचं काम करीत आहेत, बजरंग दल, आर एस एस, अशा संघटनांवर केंद्र सरकार व राज्य सरकारने तत्काळ बंदी घालण्यात यावी, संबंधित आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे, या वेळी दौंड तालुका तहसीलदार अरुण शेलार, नायब तहसीलदार भोंग भाऊसाहेब प्रामुख्याने उपस्थित होते, दौंड तालुका वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष अश्विन वाघमारे, मुस्लिम व दलित समाजातील पदाधिकारी अजिंक्य गायकवाड बबलू जगताप आनंद रणधीर बंटी भाऊ वाघमारे उपाध्यक्ष रितेश सोनवणे मुन्ना भाई शेख रोहन शिंदे शुभम वानखेडे राजू जाधव नौशाद खान, इब्राम शेख,अब्बाज सय्यद, राहुल नायडू, शिवा खरारे, संतोष कांबळे, निलेश मिसाळ,टोनी भाई जगताप, मुस्तकीर कुरेशी, आदी दौंड शहर व ग्रामीण भागातील युवा तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष