राजेंद्र प्रसाद विद्यालयाच्या विद्यार्थी शिक्षकांकडून वृक्ष दिंडीचे आयोजन
By : Polticalface Team ,17-07-2023
लिंपणगाव( प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव सुद्रिक येथील डॉ राजेंद्र प्रसाद विद्यालयाच्या विद्यार्थी व शिक्षकांनी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती अलका दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्ष दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या दिंडी सोहळ्यास उदंड असा प्रतिसाद मिळाला. याप्रसंगी या वृक्ष दिंडीमध्ये पर्यावरणासंबंधी वेगवेगळे फलक तयार करून विद्यार्थी व शिक्षकांनी तुकाराम महाराजांचा नामघोष करीत गावातून प्रभात फेरी काढण्यात आली. या वृक्षदिंडीचे विद्यालयात आगमन झाल्यानंतर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका श्रीमती अलका दरेकर या होत्या. यावेळी दिवंगत वृक्ष मित्र आबासाहेब मोरे यांची कन्या श्रीमती वनश्री मॅडम तसेच वृक्षमित्र प्रमोद काकडे हे उपस्थित होते.
याप्रसंगी श्रीमती वनश्री मॅडम यांनी आपल्या व्याख्यानातून वडील दिवंगत वृक्ष मित्र आबासाहेब मोरे यांनी वृक्ष संबंधी देश व राज्यात केलेले प्रबोधन, लावलेली झाडे, व वृक्ष संदर्भात दिलेले योगदान त्यातून वडिलांना मिळालेले राष्ट्रीय पुरस्काराविषयी माहिती सांगत, झाडे लावा झाडे वाढवा अशी प्रेरणा विद्यार्थ्यांना देत प्रत्येक विद्यार्थ्याने एक झाड लावावे असा संदेश वनश्री मॅडम यांनी यावेळी विद्यार्थी शिक्षकांना दिला.
प्रमुख व्याख्याते पर्यावरण श्री प्रमोद काकडे यांनी विद्यार्थ्यांनी झाडे तर लावावीत, परंतु जी झाडे उभे आहेत. ती खऱ्या अर्थाने जगवली पाहिजे. .वृक्षांची जवळीक साधावी, आपली संस्कृती आपणच जपावी असा संदेश देत ते पुढे म्हणाले की भारत व इतर देशातील पर्यावरणासंबंधी माहिती देत वाढत्या तापमानाची कारणे व परिणाम वृक्षमित्र श्री काकडे यांनी यावेळी सांगितले.
विद्यालयाचे शिक्षक मच्छिंद्र मडके यांनी पर्यावरण संबंधी आढावा घेतला व वृक्षमित्र दिवंगत आबासाहेब मोरे यांच्या वृक्ष लागवडी व सामाजिक कार्याचा आढावा घेत पर्यावरणासंबंधी निस्वार्थी वृत्तीने माणसे खरोखर दुर्मिळ असतात. झाडे आपल्या सर्वांचे श्वास आहेत. म्हणून त्यांना आपण खूप जपावे व पर्यावरणाचा ऱ्हास थांबावा असे आवाहन देखील श्री मडके यांनी यावेळी केले.
अध्यक्षीय भाषणात आदर्श आदर्श मुख्याध्यापिका श्रीमती अलकाताई दरेकर यावेळी म्हणाल्या की," वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे" वृक्षांना मित्र बनवून माणूस वृक्षाशिवाय जगू शकत नाही. तेव्हा प्रत्येकाने वृक्ष संवर्धन करावे, झाडे लावावीत वाढवावीत, त्यातून निसर्गाचा समतोल राखला जातो. पाऊसही भरपूर पडतो. त्यामुळे प्रत्येक झाडांमध्ये फार मोठी ताकद आहे. त्यासाठी वृक्ष लागवडीकडे प्रत्येकाचा कल असायला हवा. असे मत श्रीमती दरेकर यांनी यावेळी विद्यार्थ्यांना सांगितले.
याप्रसंगी वृक्ष मित्र प्रमोद काकडे व अशोक आळेकर यांची वृक्ष संवर्धन व पर्यावरणाचे रक्षण याविषयी सविस्तर भाषणे झाली. या वृक्षदिंडी सोहळ्यास विद्यार्थी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. सूत्रसंचालन मच्छिंद्र मडके यांनी केले. आभार जे्येष्ठ शिक्षक नारायण झेंडे यांनी मानले.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी