मोनिका ताई मगर यांचा वाढदिवस ज्येष्ठ समाजसेवक भापकर गुरूजी यांच्या उपस्थित साजरा
By : Polticalface Team ,17-07-2023
अहमदनगर : वाढदिवस म्हटल की थाट आलाच परंतु रूथ प्रेयर मिनिस्ट्री संस्थेच्या अध्यक्षा मोनिका ताई मगर यांनी त्यांचा वाढ दिवस थाटा माटात साजरा न करता व कोणताही वायफट खर्च न करता अनाथ आश्रमात मुलानं बरोबर साजरा केला त्याच्या वाढदिवसा निमित्त अनेक सामजिक उपक्रम राबविले जातात गरीब व गरजू विद्यार्थ्यांना नेहमी त्या मदत करत असतात
आई-वडिलांच्या कुशीत जाते तेच खरे बालपण; परंतु कित्येक बालकांच्या नशिबी असे बालपण येतच नाही.
रस्त्याच्या कोपऱ्यावर किंवा कचराकुंडीजवळ फेकून दिलेल्या या निष्पाप कोवळ्या जीवाला मग कुठल्या तरी अनाथाश्रमात स्थान मिळते. तेच त्याचे कुटुंब बनते. अशा अनाथ मुलांना आई-वडिलांच्या प्रेमाची उणीव भासणार नाही,अशा पद्धतीने लळा लावून त्यांचे संगोपन करणाचा भविष्यात माझा विचार असल्याचे रूथ प्रेयर मिनिस्ट्री संस्थेच्या अध्यक्षा मोनिका मगर यांनी सांगितले , यावर्षी त्यांनी नगर जिल्ह्यातील केडगाव येथील सावली फाऊंडेशन चे अनाथ आश्रमात जाऊन लहान अनाथ मुलानं समवेत वाढदिवस साजरा केला.
त्यावेळी त्यांनी तेथील लहान अनाथ मुलानं समवेत संवाद साधला यावेळी रूथ प्रेयर मिनिस्ट्री संस्थेच्या अध्यक्षा मोनिका ताई मगर यांचे वाढदिवसाच्या निमित्ताने तेथील मुलींनी औक्षण केले त्यांचा वाढदिवस ज्येष्ठ समाज सेवक माउटणं मॅन राजाराम भापकर (गुरुजी) यांच्या हस्ते केक कापून साजरा करण्यात आला त्या नंतर लहान अनाथ आश्रमातील मुला मुलींना स्नेहभोजन दिले
वाचक क्रमांक :