अजनुज येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे उपोषण

By : Polticalface Team ,17-07-2023

अजनुज येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे उपोषण
प्रतिनीधी श्रीगोंदा:- तालुक्यांतील अजनुज येथील मूळ प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या जमीनी भीमा-उजनी धरण प्रकल्पात संपादित झाली आहे असे गट नंबर ४५४/२, ४५२/२,४५७/२, ४७२/२, ४४४/२,४६०/२, ४६१, ४४३/२,१३. या संपादित जमिनीमध्ये काही त्रयस्थ व्यक्तींनी अनधिकृत अतिक्रमण करून पिके घेत आहेत.गेली पाच ते सहा वर्षे हे या लोकांनी जबरदस्तीने व दंडेलशाहीने या जमिनींमध्ये अतिक्रमण केले आहे.पंधरा ते वीस शेतकरी कुटूंबियांचे गाळपेर क्षेत्र हे काही मोजक्याच धनदांडग्या त्रयस्थ लोकांनी अतिक्रमित केले आहेत केलेले अतिक्रमने तात्काळ काढावीत या मागणीसाठी श्रीगोंदे तहसील कार्यालयासमोर ८ व्या दिवशी ही शेतकर्यांचे उपोषण सुरू आहे . मूळ प्रकल्पग्रस्त शेतकरी गेली तीन वर्षांपासून उजनी धरण व्यवस्थापन विभाग भिमानगर ता.माढा जि. सोलापूर यांच्याकडे वेळोवेळी तक्रार करूनही हे त्रयस्थ अतिक्रण धारक लोकांना संबधीत कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी स्थळ पहाणी करून त्यांना अतिक्रमण हटवावे यासाठी दोन ते तीन वेळेस नोटिसा दिलेल्या आहेत परंतु हे त्रयस्थ व्यक्ती संबंधित कार्यालयाच्या नोटीस बाबत कुठलीही भीती न बाळगता त्या क्षेत्रात अतिक्रमण करीत आहेत. अतिक्रमण काढण्यासाठी उपअभियंता ,उजनी धरण व्यवस्थापन विभाग भिमानगर ता.माढा जि. सोलापूर यांनी भूमी अभिलेख श्रीगोंदे यांच्याकडे या वरील संपादित गटाची अतिक्रमण काढण्याकरिता मोजणी करण्यासाठी संपूर्ण मोजणी फी भरलेली आहे. मूळ प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना दि.०३/०७/२०२३ ते ०७/०७/२०२३ पर्यंत मोजणी करून देऊ असे पत्र दिले.दि.०३/०७/२०२३ रोजी अजनुज येथे मोजणी स्थळी मोजणी अधिकारी गेले असता त्यांनी त्रयस्थ व्यक्तींच्या हरकत अर्जावरून मोजणी न करता फक्त पंचनामा करून परतले,त्यामुळे मूळ प्रकल्पग्रस्थ शेतकरी दि.०६/०७/२०२३ पासून ते दिनांक १३/०७/२०२३ तहसीलदार कार्यालयासमोर उपविभागीय अभियंता उजनी धरण व्यवस्थापन विभाग भिमानगर, ता. माढा जि.सोलापूर व भूमिअभिलेख विभाग श्रीगोंदे जि.अहमदनगर यांच्या विरोधात आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत,आजचा उपोषणाचा आठवा दिवस आहे परंतु आज दि.१३/०७/२०२३ पर्यंत या दोनही कार्यालयांनी संपादित गटाची मोजणी केलेली नाही व अनधिकृत अतिक्रमण झालेल्या क्षेत्रात मोजणी करून हद्द खुणा कायम केलेल्या नाहीत, या आठ दिवसांपासून हे उपोषण चालू असल्याने उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली असून देखील प्रशासन कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही. या पूर्वी उपोषण कर्त्यांनी उजनी धरण व्यवस्थापन विभाग भिमानगर, ता. माढा व तहसीलदार कार्यालयासमोर चार वेळेस उपोषण केलेले आहे दि.०६/०७/२०२३ रोजी मूळ प्रकल्पग्रस्त शेतकरी यांचे पाचवे उपोषण आहे,परंतु अजूनही त्यांना न्याय मिळालेला नाही.शासनाने मूळ मालक यांची उजनी धरण प्रकल्पात जमीन संपादित करून भूमिहीन केले आहे व ती जमीन अनधिकृत अतिक्रमण धारक यांना मशागत व पिके घेण्यास परवानगी दिली आहे का? असे असल्यास मूळ प्रकल्पग्रस्थ शेतकऱ्यांवर शासनाने अन्याय केला आहे,त्यामुळे मूळ प्रकल्प ग्रस्थ शेतकरी शासनाकडे न्याय मागत आहेत.शासनाने मूळ प्रकल्पग्रस्थ शेतकऱ्यांना शासनाच्या नियमानुसार संपादित जमिनीची मोजणी करून, हद्द-खुणा निश्चित करून, अतिक्रमण काढून ताब्यात द्यावी किंवा ती जमीन शासनाने स्वतःच्या ताब्यात घ्यावी ही विनंती.उपोषणकर्त्ये:- अनिल पांडुरंग क्षिरसागर,गोरख चंद्रकांत क्षिरसागर,बंडू दत्तात्रेय क्षिरसागर,सुदाम जनार्धन क्षिरसागर,जालिंदर नामदेव गिरमकर,सचिन दिगंबर क्षिरसागर ,दिलीप चंद्रकांत क्षिरसागर ,शिवाजी बापूराव वाघमारे,मनीषा गोरख क्षिरसागर,पदमबाई दिगंबर क्षिरसागर ,विजया शिवाजी वाघमारे ,अरुण वामन क्षिरसागर ,शिवाजी माणिक क्षिरसागर ,निळकंठ माणिक क्षिरसागर ,मोहन माणिक क्षिरसागर या शेतकऱ्यांनी श्रीगोंदे तहसील कार्यालयासमोर महिला पुरुष शेतकऱ्यांनी उपोषण सुरू केले आहे.या उपोषणास भारतीय राष्ट्र समितीचे घनश्याम शेलार यांनी भेट घेऊन चर्चा केली आहे . अजनुज येथील आठ दिवसापासून उपोषण करणारे ग्रामस्थ यांची प्रकृती खालावली असल्याने उपोषण स्थळी उपचार सुरु .
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.