करमाळा येथे
पळुन आलेली साताऱ्यांची अल्पवयीन मुलगी व जामखेडचा युवक करमाळा पोलिसांच्या ताब्यात पोलिस पाटील यांचे सर्वत्र कौतुक..
By : Polticalface Team ,20-07-2023
करमाळा प्रतिनिधी
सातारा जिल्ह्यातील अल्पवयीन मुली सोबत प्रेम संबंध ठेऊन तिला पळून घेऊन येणाऱ्या जामखेडच्या युवकाला करमाळ्यात पोलिस पाटील संघटनेचे तालुकाध्यक्ष संदीप शिंदे-पाटील यांच्या मदतीने पकडण्यात यश आले आहे. सातारा पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार पोथऱ्यांचे पोलीस पाटील संदीप शिंदे यांनी सदरची कामगिरी करताना मोठ्या शिताफीने पाठलाग करुन संबंधित त्या दोघांना ताब्यात घेतले. त्या नंतर दोघांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. या कामगिरी बद्दल शिंदे यांचा करमाळ्याचे पोलिस निरिक्षक ज्योतीराम गुंजवटे व साताराचे सहाय्यक पोलिस निरिक्षक अभिजीत चौधरी यांनी पाटील यांचे कौतुक केले आहे.
यामध्ये मिळालेल्या माहितीनुसार जामखेड तालुक्यातील युवक महेश जगताप रा. गुरेवाडी, तालुका जामखेड याचे कुंभारगाव तालुका पाटण जिल्हा सातारा येथील सतरा वर्षीय अल्पवयीन मुली सोबत प्रेम संबंध जडले होते. दोघांनांही घरच्यांकडून होता.तो विरोध डावलून दोघांनी पळून जाण्याचे ठरवलं. तो तिला घेऊन करमाळा तालुक्यात येऊन वास्तव्य करत असलेल्याची माहिती सातारा पोलिसांना मिळाली. त्यावरून त्यांनी पोथरे येथील पोलीस पाटील शिंदे यांच्याशी संपर्क साधला आसता संदीप पाटील यांना एक फोटो मिळाला त्यावरून आणि काही ठिकाणंचा ठाव-ठिकाणा देखील मिळाला.आणि लागलीच त्या ठिकाणंचा तपास केला असता.ते त्या ठिकाणी मिळून आले नाही. त्यानंतर पाटील यांना सदर दोघेही करमाळ्याच्या दिशेने गेले असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी करमाळा नगर रोड येथील बायपास रस्त्यावर जय हिंद हॉटेल शेजारी सदरच्या दोघांना ताब्यात घेतले व करमाळा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
वाचक क्रमांक :