जिल्हा माध्यमिक शिक्षकेतर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची वेतन पथकाच्या अधीक्षकांशी विविध प्रलंबित प्रश्न संदर्भात सखोल चर्चा

By : Polticalface Team ,25-07-2023

जिल्हा माध्यमिक शिक्षकेतर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची वेतन पथकाच्या अधीक्षकांशी विविध प्रलंबित प्रश्न संदर्भात सखोल चर्चा लिंपणगाव (प्रतिनिधी)-- राज्य शिक्षकेतर महासंघ औरंगाबाद सलग्न असणाऱ्या अहमदनगर जिल्हा शिक्षकेतर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक अहमदनगर अधीक्षकांशी वेतन पथकातील प्रलंबित प्रकरणांची तातडीने कार्यवाही करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन माध्यमिक विभागाचे वेतन पथकाच्या अधीक्षकांशी सखोल प्रलंबित प्रकरणांसंदर्भात आढावा घेऊन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे तातडीने हे प्रश्न मार्गी लावावेत, अशा मागणीचे निवेदन सादर करण्यात आल्याची माहिती अहमदनगर जिल्हा शिक्षकेतर संघटनेचे जिल्हाध्यक्ष पाराजी मोरे व कार्याध्यक्ष समशेर पठाण व यांनी दिली. शिक्षणाधिकारी माध्यमिक व वेतन पथकाचे अधीक्षक यांना जिल्हा शिक्षकेतर संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, सेवानिवृत्ती व वेतन प्रस्ताव वेळेत महालेखागार यांना सादर करून पूर्तता व त्रुटी बाबतचे प्रकरणांची यादी दर्शनी भागात लावावी, सेवानिवृत्त व मयत कर्मचाऱ्यांची सातवा वेतन आयोग फरकाची बिले पारित करावीत, तसेच सेवानिवृत्त व मयत कर्मचाऱ्यांची भविष्य निर्वाह निधी अंतिम प्रदानाची बिले पारित करावी, सेवानिवृत्त व मृत कर्मचाऱ्यांची अर्जित रजा रोखीकरण बिले अदा करावीत, नियमित कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग फरकाची बिले तात्काळ अदा करावी व प्रलंबित मेडिकल बिले निकाली काढून त्यांची यादी जाहीर करावी, नियमित वेतन देयके वेळेवर व राष्ट्रीयकृत बँकेतून मिळावीत, प्रलंबित पुरवणी वेतन देयके तात्काळ मंजूर करून सर्व बिले दाखल व ते दिनांकपासून क्रमवारीने अदा करावीत, नियमित कर्मचारी भविष्य निर्वाह निधी परतावा/ नापरतावा ॲडव्हान्स दिले पारित करावीत, कार्यालयीन कर्मचाऱ्यांचे दैनंदिन कामकाजाचे नियोजन करून वरील प्रकरणांचा जलद निपटारा होण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यात यावी, शालार्थ आयडी प्रलंबित प्रकरणे त्वरित निकाली काढावीत, एन पी एस डी सी पी एस कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग दुसरा व तिसरा हप्ता अदा करावा आदी वरील विषयांबाबत जिल्हा शिक्षकेतर संघाच्या पदाधिकाऱ्यांशी योग्य ती चर्चा करून कार्यवाही करण्यात यावी. अशा स्वरूपाचे निवेदन शिक्षणाधिकारी व वेतन पथकाचे अधीक्षक यांना संघटनेच्या वतीने देण्यात आले. यावेळी जिल्हा माध्यमिक शिक्षकेतर संघटनेचे सरचिटणीस भाऊसाहेब धनवटे, सहचिटणीस कमलेश मुथा, जिल्हा संघटनेचे पदाधिकारी सर्वश्री परशुराम वेताळ श्रीरामपूर, गणेश पोकळे अहमदनगर, राजू पठाण शिर्डी, कमलेश गायकवाड कोपरगाव, सुनील वारे जामखेड, सतीश बडदे पाथर्डी, किशोर जामदार श्रीगोंदा, सदाशिव काटेकर शेवगाव, राजू दुबल कर्जत, नारायण ढाकणे पाथर्डी, नंदकुमार कुरुमकर श्रीगोंदा, सतीश ओहोळ कर्जत, नारायण ढाकणे पाथर्डी, सुनील वैरागर नेवासा, किशोर बरकडे श्रीरामपूर, आदी जिल्हा व तालुका पदाधिकारी यावेळी चर्चेदरम्यान उपस्थित होते.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

भविष्यात मृत्यू नंतर मानवी शरीर शासन संपती म्हणून जाहीर करण्याची आवश्यकता आमदार राहुल कुल.

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2. या अभियानात न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव विद्यालयाला तालुक्यात तृतीय क्रमांकाचे बक्षीस.

प्राविण्य प्राप्त खेळाडूंचे प्रमाणपत्र न मिळाल्याने खेळाडू व शिक्षक हवालदिल , स्पर्धा आयोजनाचा निधीही प्रतिक्षेत

स्टेट बँक ऑफ इंडिया व्यवस्थापकांची श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयास भेट

नागपूर हिवाळी अधिवेशनात आमदार राहुल कुल यांनी दौंड तालुक्यातील विविध विषयांवर महत्वाचे मुद्दे मांडले.

कुकडीचे रब्बी आवर्तन उद्या पासून सुरू,,,,,,, आमदार नारायण आबा पाटील यांची माहिती

शिक्षक भारतीच्या वतीने शिक्षण उपसंचालक हरून आत्तार यांचा सन्मान, प्रलंबित प्रश्नांसंदर्भात सकारात्मक चर्चा

तालुकास्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धेत PM SHRI जि. प. शाळा,श्रीगोंदा मुले शाळेचे घवघवीत यश

लिंपणगाव -काष्टी रेल्वे गेटच्या उड्डाणपुलाबाबत आमदार खासदारांनी लक्ष घालावे; प्रवासी व वाहन चालकांची मागणी

न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव च्या माजी विद्यार्थ्याचे चित्रपट क्षेत्रात पदार्पण.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी कार्यकाळ वाढवून द्या प्रशिक्षणार्थ्यांची मागणी....सेवेत रुजू राहण्यासाठी कार्यकाळ वाढवा मुख्यमंत्री लाडक्या बहीण भावांची मागणी...

आमदार विक्रमसिंह पाचपुते यांची पेढेतुला करून वांगदरीत केला आनंद साजरा.

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा श्री गणेशा मराठी चित्रपट २० डिसेंबरला होणार प्रदर्शित...

महात्मा फुले नूतन महाविद्यालयात आंतर विभागीय नेटबॉल स्पर्धा संपन्न.

संविधान प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या मनुरुग्नावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. परभणी हिंसाचार प्रकरणी हवेली तालुका आर पी आय आक्रमक.

आमदार सत्यजित तांबे हे सुधीर तांबे यांचा वारसा पुढे चालवत आहेत - बाजीराव कोरडे .

नशीब बलवत्तर म्हणून शेतकरी श्री नेटवटे हे बिबट्याच्या हल्ल्यातून बालंबाल बचावले ! लोणी व्यंकनाथमध्ये बिबट्याची दहशत कायम

परभणी येथील सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कोठडीतील मृत्यू प्रकरणी जबाबदार पोलिसांना बडतर्फ करावे - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले.

महायुती ला साथ दिली तरी ही रिपब्लिकन पक्षाला मंत्रिमंडळात न्याय मिळाला नाही - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले.

श्री क्षेत्र माळवाडी पडवी येथे दत्त जयंती सोहळा उत्साहात संपन्न. दौंड तालुक्यातील भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती.