बनावट दस्तएवजाच्या आधारे केली फसवणूक.... सहा जणांवर श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

By : Polticalface Team ,26-07-2023

बनावट दस्तएवजाच्या आधारे केली फसवणूक.... सहा जणांवर श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
श्रीगोंदा प्रतिनिधी:- श्रीगोंदा तालुक्यातील कोथुळ येथील गट नं.२११ चे खोटे दस्तऐवज तयार करत जमिनीवर दावा करणाऱ्या सहा जणांवर श्रीगोंदा पोलीस ठाण्यात भरत गबाजी धस हल्ली रा. घाटकोपर मुंबई, मूळ रा. कोथूळ यांच्या फिर्यादीवरून सविता आत्माराम धस, बाजीराव बावु धस, आत्माराम बाजीराव धस रा. कोथुळ ता. श्रीगोंदा, दत्तात्रय भागुजी पोटे रा. पळवे बु. ता. पारनेर, वसीम शेख रा.वि. वाडी पुणे, विशाल घाडगे रा. येरवडा पुणे यांचे विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार घाटकोपर मुंबई येथे राहणारे भरत गबाजी धस यांची तालुक्यातील कोथूळ येथे गट नं.२११ मधील त्यांच्या हिस्याची तसेच त्यांच्या भावाच्या हिस्याची शेतजमीन कोथूळ येथील धंनजय लाटे यांच्याशी सौदा करत सोनाली धनंजय लाटे व दिपाली मनोहर लाटे यांच्या नावे विक्री केली. मात्र या जमिनीची नोंद न होणे बाबत सविता आत्माराम धस व शैला नवनाथ धस यांनी बोगस आणि खोट्या दस्ताऐवजांच्या आधाराने तलाठी भानगाव यांचेकडे तक्रारी अर्ज दाखल केला होता. तक्रारी अर्जावर मंडळ अधिकारी कोळगाव यांचेकडील तक्रार केस क्र.९८/२०२१ अन्वये केस चालवुन दिनांक १ऑक्टोबर २०२१ सविता आत्माराम धस, शैला नवनाथ धस यांचा अर्ज नामंजुर करत त्या जमिनीची नोंद लागली. मात्र बाजीराव बाबु धस यांनी २७ डिसेंबर २०२१ रोजी भरत गबाजी धस, रोहिदास गबाजी धस आणि दिपाली मनोहर लाटे व सोनाली धनंजय लाटे यांचे विरुदध श्रीगोंदा येथील दिवाणी न्यायालयात बनावट नोटरी साठेखत दस्ताएवेज आधारे दावा क्र.389/2021 दाखल केला होता. दि. १३ डिसेंबर २०२२ रोजी दावा न्यायलयाने नामजुंर केला. भरत गबाजी धस, रोहिदास गबाजी धस यांचे वेगवेगळ्या दस्तामध्ये वापरलेल्या आधारकार्डची प्रत वापरून व सन २०२० मध्ये गट नं. २११ चा जुना हस्तलिखीत सगद क्र.२०६१/२०१९ पान 14-24 व 15-24 या 7/12 उतारा वापरून बनावट साठेखत नोटरी नोंदवुन नोटरी दस्त नं.360/2020 हि खरी असल्याचे न्यायालयाचे समक्ष सांगुन माझी फसवणुक केल्या प्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संपत कन्हेरे करत आहेत.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

भविष्यात मृत्यू नंतर मानवी शरीर शासन संपती म्हणून जाहीर करण्याची आवश्यकता आमदार राहुल कुल.

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2. या अभियानात न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव विद्यालयाला तालुक्यात तृतीय क्रमांकाचे बक्षीस.

प्राविण्य प्राप्त खेळाडूंचे प्रमाणपत्र न मिळाल्याने खेळाडू व शिक्षक हवालदिल , स्पर्धा आयोजनाचा निधीही प्रतिक्षेत

स्टेट बँक ऑफ इंडिया व्यवस्थापकांची श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयास भेट

नागपूर हिवाळी अधिवेशनात आमदार राहुल कुल यांनी दौंड तालुक्यातील विविध विषयांवर महत्वाचे मुद्दे मांडले.

कुकडीचे रब्बी आवर्तन उद्या पासून सुरू,,,,,,, आमदार नारायण आबा पाटील यांची माहिती

शिक्षक भारतीच्या वतीने शिक्षण उपसंचालक हरून आत्तार यांचा सन्मान, प्रलंबित प्रश्नांसंदर्भात सकारात्मक चर्चा

तालुकास्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धेत PM SHRI जि. प. शाळा,श्रीगोंदा मुले शाळेचे घवघवीत यश

लिंपणगाव -काष्टी रेल्वे गेटच्या उड्डाणपुलाबाबत आमदार खासदारांनी लक्ष घालावे; प्रवासी व वाहन चालकांची मागणी

न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव च्या माजी विद्यार्थ्याचे चित्रपट क्षेत्रात पदार्पण.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी कार्यकाळ वाढवून द्या प्रशिक्षणार्थ्यांची मागणी....सेवेत रुजू राहण्यासाठी कार्यकाळ वाढवा मुख्यमंत्री लाडक्या बहीण भावांची मागणी...

आमदार विक्रमसिंह पाचपुते यांची पेढेतुला करून वांगदरीत केला आनंद साजरा.

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा श्री गणेशा मराठी चित्रपट २० डिसेंबरला होणार प्रदर्शित...

महात्मा फुले नूतन महाविद्यालयात आंतर विभागीय नेटबॉल स्पर्धा संपन्न.

संविधान प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या मनुरुग्नावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. परभणी हिंसाचार प्रकरणी हवेली तालुका आर पी आय आक्रमक.

आमदार सत्यजित तांबे हे सुधीर तांबे यांचा वारसा पुढे चालवत आहेत - बाजीराव कोरडे .

नशीब बलवत्तर म्हणून शेतकरी श्री नेटवटे हे बिबट्याच्या हल्ल्यातून बालंबाल बचावले ! लोणी व्यंकनाथमध्ये बिबट्याची दहशत कायम

परभणी येथील सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कोठडीतील मृत्यू प्रकरणी जबाबदार पोलिसांना बडतर्फ करावे - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले.

महायुती ला साथ दिली तरी ही रिपब्लिकन पक्षाला मंत्रिमंडळात न्याय मिळाला नाही - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले.

श्री क्षेत्र माळवाडी पडवी येथे दत्त जयंती सोहळा उत्साहात संपन्न. दौंड तालुक्यातील भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती.