शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी राजेंद्र म्हस्के यांचे धरणे आंदोलन...!!
By : Polticalface Team ,26-07-2023
श्रीगोंदा प्रतिनिधी
दि:-२५ जुलै २०२३
तालुक्यातील विविध प्रश्नांसाठी शेतकरी नेते राजेंद्र म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
त्यामध्ये ओला दुष्काळाची मदत तातडीने जमा करावी.तसेच कांद्याचे अनुदान तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करा तसेच श्रीगोंदा तालुक्यात अद्यापही पाऊस नाही,तरी शेतकऱ्यांना तातडीची पन्नास हजार रुपये मदत मिळावी.तालुक्यात विविध विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी आला असून या कामांमधील भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी यासह आदी मागण्यांसाठी हे धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी बोलत असताना राजेंद्र म्हस्के म्हणाले की,गेल्या वर्षी ओल्या दुष्काळाने गाठलं तर यंदा अद्यापही पाऊस नाही त्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात संकटात आहे.ओल्या दुष्काळाची मदत अजूनही मिळाली नाही.तसेच कांद्याचे अनुदान तातडीने जमा करावे.संकटात सापडलेल्या शेतकरी वर्गाला सावरण्यासाठी पन्नास हजार रुपये मदत मिळावी याकरिता हे आंदोलन करण्यात आले.जर लवकरात लवकर मागण्या मान्य न झाल्यास कृषिमंत्र्यांच्या दारासमोर उपोषणास बसणार आहे.
भारत राष्ट्र समिती पक्षाचे नेते घनश्याम शेलार म्हणाले की, आजकाल आंदोलनकर्त्यांनी खिल्ली उडविली जात आहे.ज्यांच्यासाठी आंदोलने केली जात आहेत त्यांची एकजूट नसल्यामुळे प्रशासन भूमिका घेत नाही.परंतू तालुक्यातील प्रश्नांना न्याय मिळवून देयाचा असेल तर लढाऊ कार्यकर्त्यांनी व सर्वसामान्य जनतेने एकत्र येऊन प्रस्थापितांच्या विरोधात लढणं गरजेचे आहे.
तहसीलदार मिलिंद कुलथे यांच्या लेखी आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.यावेळी भास्कर वागस्कर गंगाराम मचे,पी.जे.दरेकर, बाळासाहेब पवार, बाळासाहेब लोंढे, विठ्ठल बिबे, दादासाहेब मोटे,महादेव म्हस्के आदी मान्यवर उपस्थित होते.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी