तालुकास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेचे करमाळा येथे आयोजन, शिक्षणाधिकारी सोलापूर यांचे हस्ते होणार पारितोषिक वितरण

By : Polticalface Team ,26-07-2023

तालुकास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेचे करमाळा येथे आयोजन,            शिक्षणाधिकारी सोलापूर यांचे हस्ते होणार पारितोषिक वितरण करमाळा प्रतिनिधी यशकल्यानी सेवाभावी संस्था, शिक्षण विभाग पंचायत समिती करमाळा व इंग्लिश लँग्वेज टीचर्स असोसिएशन करमाळा यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. लीलाताई दिवेकर यांच्या स्मरणार्थ तालुकास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा गुरुवार दिनांक 27 जुलै 2023 रोजी घेण्यात येणार आहे. तालुक्यातील विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी भाषण कौशल्य विकसित व्हावे व त्यांच्या व्यावहारिक जीवनातआत्मविश्वासाने इंग्रजी बोलण्याचे धाडस निर्माण व्हावे या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यशकल्याणी सेवाभवन गिरधरदास देवी विद्यालय करमाळा या ठिकाणी ही स्पर्धा घेतली जाणार आहे. यासाठी तज्ञ परीक्षक म्हणून माढा ,परांडा ,कर्जत व बार्शी येथील शिक्षक काम पाहणार आहेत. ही स्पर्धा तीन गटांमध्ये घेतली जाणार आहे. पहिला गट - इ.पाचवी, सहावी, दूसरा गट इ सातवी ,आठवी तर तिसरा गट इ. नववी , दहावी चा असेल . स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभाचे दिवशी दू.2.00 वा. यशकल्याणी सेवाभवन येथे प्रा. गणेश करे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार असून या कार्यक्रमास सोलापूरच्या माध्य. शिक्षणाधिकारी डॉ. तृप्ती अंधारे तसेच प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री.संजय जावीर, गटशिक्षण अधिकारी श्री.राजकुमार पाटील, ग्रामसुधार समितीचे अध्यक्ष डॉ. बाबुराव हिरडे, हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. पत्रकार बांधवांचीही या समारंभास उपस्थिती असणार आहे . स्पर्धा विजेत्यांना यशकल्याणी परिवाराच्या वतीने सन्मानचिन्ह व प्रमाणपत्रासह रोख रकमेची पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे. यशकल्याणी सेवाभावी संस्थेसह, पं.स. शिक्षण विभाग, व इंग्लीश टीचर्स असोसिएशन द्वारे विद्यार्थी व्यक्तीमत्व विकासासाठी करमाळा तालुक्यात हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत असून यापुढेही अशा शैक्षणिक उपक्रमांना प्राधान्य दिले जाईल असे ,इंग्लीश टीचर्स असोसिएशनचे प्रमुख सल्लागार , यश कल्याणी संस्थेचे अध्यक्ष प्रा. करे-पाटील यांनी सांगितले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

भविष्यात मृत्यू नंतर मानवी शरीर शासन संपती म्हणून जाहीर करण्याची आवश्यकता आमदार राहुल कुल.

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2. या अभियानात न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव विद्यालयाला तालुक्यात तृतीय क्रमांकाचे बक्षीस.

प्राविण्य प्राप्त खेळाडूंचे प्रमाणपत्र न मिळाल्याने खेळाडू व शिक्षक हवालदिल , स्पर्धा आयोजनाचा निधीही प्रतिक्षेत

स्टेट बँक ऑफ इंडिया व्यवस्थापकांची श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयास भेट

नागपूर हिवाळी अधिवेशनात आमदार राहुल कुल यांनी दौंड तालुक्यातील विविध विषयांवर महत्वाचे मुद्दे मांडले.

कुकडीचे रब्बी आवर्तन उद्या पासून सुरू,,,,,,, आमदार नारायण आबा पाटील यांची माहिती

शिक्षक भारतीच्या वतीने शिक्षण उपसंचालक हरून आत्तार यांचा सन्मान, प्रलंबित प्रश्नांसंदर्भात सकारात्मक चर्चा

तालुकास्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धेत PM SHRI जि. प. शाळा,श्रीगोंदा मुले शाळेचे घवघवीत यश

लिंपणगाव -काष्टी रेल्वे गेटच्या उड्डाणपुलाबाबत आमदार खासदारांनी लक्ष घालावे; प्रवासी व वाहन चालकांची मागणी

न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव च्या माजी विद्यार्थ्याचे चित्रपट क्षेत्रात पदार्पण.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी कार्यकाळ वाढवून द्या प्रशिक्षणार्थ्यांची मागणी....सेवेत रुजू राहण्यासाठी कार्यकाळ वाढवा मुख्यमंत्री लाडक्या बहीण भावांची मागणी...

आमदार विक्रमसिंह पाचपुते यांची पेढेतुला करून वांगदरीत केला आनंद साजरा.

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा श्री गणेशा मराठी चित्रपट २० डिसेंबरला होणार प्रदर्शित...

महात्मा फुले नूतन महाविद्यालयात आंतर विभागीय नेटबॉल स्पर्धा संपन्न.

संविधान प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या मनुरुग्नावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. परभणी हिंसाचार प्रकरणी हवेली तालुका आर पी आय आक्रमक.

आमदार सत्यजित तांबे हे सुधीर तांबे यांचा वारसा पुढे चालवत आहेत - बाजीराव कोरडे .

नशीब बलवत्तर म्हणून शेतकरी श्री नेटवटे हे बिबट्याच्या हल्ल्यातून बालंबाल बचावले ! लोणी व्यंकनाथमध्ये बिबट्याची दहशत कायम

परभणी येथील सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कोठडीतील मृत्यू प्रकरणी जबाबदार पोलिसांना बडतर्फ करावे - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले.

महायुती ला साथ दिली तरी ही रिपब्लिकन पक्षाला मंत्रिमंडळात न्याय मिळाला नाही - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले.

श्री क्षेत्र माळवाडी पडवी येथे दत्त जयंती सोहळा उत्साहात संपन्न. दौंड तालुक्यातील भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती.