जळगाव येथील वर्धिष्णू सामाजिक संस्थेची सहारा सर्वांगीण विकास संस्थेला सदिच्छा भेट. संस्थेच्या पुढील वाटचालीवर चर्चा.
By : Polticalface Team ,29-07-2023
लिंपणगाव (प्रतिनिधी) -संस्थेच्या काम शाश्वत चालू राहावे तसेच संस्थेच्या अडचणीवर एकमेकांची मदत करून त्यावर शाश्वत उपाययोजना करून काम प्रभावी पणें पुढे कसे न्यावे कोणकोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे त्या सर्व गोष्टीवर वर्धिष्णू सह सहारा सर्वांगीण संस्था काम करत आहे . या वर्षीच्या वर्धिष्णू संस्थेच्या कम्युनिटी कॉलेक्टिवेस च्या 10 संस्थांमध्ये श्रीगोंदा येथील सहारा सर्वांगीण विकास संस्था सहभागी
संस्था आहे. यांची संपूर्ण प्रक्रिया यशस्वी पणे पूर्ण करून सहारा सर्वांगीण विकास संस्था जळगाव येथे पहिली ट्रेनिंग जुने महिन्यात पूर्ण केले आणि भविष्यातील संस्थेचे आखीव स्वरूपातील काम करण्यास सुरूवात झाली. आता आपली सहारा संस्था कसं आणि कोणत्या मुद्द्यावर काम करणार आणि सहारा संस्थेच श्रीगोंदा तालुक्यात काम कसं चालू आहे हे पाहण्यासाठी वर्धिष्णू संस्थेचे प्रदीप गुजर आणि श्रीकांत पवार श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथे आले होते.
संस्थात्मक पातळीवर तसेच कार्यक्रम पातळीवर संस्थेला काय अडचणी आहेत तसेच भविष्यात संस्था काय काम करणार त्या कामाकडे आपण कसे पाहतोय व समाजातील समस्या समाधान कसे होईल अशा अनेक गोष्टीवर सखोल चर्चा झाली.
सहारा सर्वांगीण विकास संस्थेने मुलांसोबत आणि मुलांच्या पालकांसोबत केलेल्या ऍक्टिव्हिटीज आणि करत असलेलं काम वर्धिष्णू संस्थेला प्रत्यक्षात शाळा भेटी आणि आदिवासी पारधी वस्ती भेटी घेऊन दाखवण्यात आले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पवार वस्ती, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोणी व्यंकनाथ, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दक्षिण काकडेवाडी या शाळांना आणि आदिवासी पारधी वस्तीला भेट दिली.
यावेळी मी इकोनेट संस्थे अंतर्गत करत असलेल्या कार्यक्षेत्राची पाहणी केली तसेच सहारा सर्वांगीण विकास संस्थेच्या सचिव छाया भोसले यांनी मासूम संस्थे अंतर्गत चालू असलेल्या संविधान संवर्धन फेलोशिपचे काम वर्धिष्णू संस्थेच्या टीमला सांगितली यावेळी सहारा संस्थेचे विश्वस्त प्रसाद भिवसणे आणि महीला व पुरूष उपस्थित होते अशी माहिती सहारा सर्वांगीण विकास संस्थेचे अध्यक्ष संतोष भोसले यांनी दिली.
वाचक क्रमांक :