राज्यात पशुवैद्यकीय पदवी व पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यास, विरोध करणे योग्य आहे का ? डॉ.सागर आरुटे, यांचा सवाल

By : Polticalface Team ,30-07-2023

राज्यात पशुवैद्यकीय पदवी व पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यास, विरोध करणे योग्य आहे का ? डॉ.सागर आरुटे, यांचा सवाल दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, पुणे ता. २९ जुलै २०२३, महाराष्ट्र राज्यातील पशुवैद्यकीय क्षेत्रात अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे, महाराष्ट्राची भौगोलिक रचना पाहता, राज्यातील कोट्यावधीच्या संख्येत पशुधन, शेळी, मेंढी कुक्कुट, वर्ग इ. यांना देण्यात येणारी पशुवैद्यकीय सेवा वेळेत व रात्री अपरात्री तत्काळ मिळावी. मात्र सध्याच्या परीस्थितीमध्ये पशुवैधुकांची संख्या पुरेशी उपलब्ध व्हावी या दृष्टिकोनातून महाराष्ट्र राज्याचे मंत्री मा.ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी व राज्याच्या मंत्रीमंडळाने कुशल तसेच आधुनिक पशुवैद्यकीय ज्ञान युक्त मनुष्यबळ उपलब्ध व्हावे म्हणून घेतलेला महत्वपूर्ण निर्णय अतिशय महत्त्वाचा व प्रगतीशील असुन, पुढील काळातील अडचणींचा विचार करून केला असल्याचे दिसून येत आहे, या संदर्भात महाराष्ट्र राज्याने तातडीने अंमल बजावणी करणे काळाची गरज आहे मात्र या प्रकरणी काही मतलबी लोकांनी विरोध करणे अतिशय दुर्दैवी बाब असल्याची प्रतिक्रिया, पशुवैद्यकीय पशुसंवर्धन व दुग्ध व्यवस्थापन सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष डॉ,सागर आरुटे यांनी व्यक्त केली आहे, तसेच पुढे बोलताना ते म्हणाले राज्यातील काही पशुवैद्यकीय पदवीधर आपली मक्तेदारी कायम राहावी या हेतूने विरोध करत आहेत. तसेच फक्त शासकीय संस्थेतुनच शिकणारे विद्यार्थीच नोकरीला लागले पाहिजेत व त्यांनीच पशुवैद्यकीय सेवा पुरविली पाहिजे, हि अतिशय दुर्दैवी संकल्पना चुकीची आहे. मानवी वैद्यकीय क्षेत्रात विविध माध्यमांतून (MBBS, MS, MD, BAMS, BHMS, BUMS) वैद्यकीय शिक्षण घेऊन सर्वजण रुग्णसेवा करीत आहेत. भारतातील छत्तीसगड या राज्यात जम्मु व काश्मीर, पांडेचेरी केंद्र शासकीय प्रदेशात BSc Zoology नंतर पदविका अभ्यासक्रम सुरू आहेत. तसेच उत्तर प्रदेश मध्ये Diploma in Veterinary Science व Diploma in Veterinary Pharmacy असे दोन वेगवेगळे पदविका अभ्यासक्रम सुरू आहेत. इतर दहा राज्यांमध्ये पदविका अभ्यासक्रम भारतीय पशुवैद्यक कायद्याच्या चौकटीत सुरू आहेत. ही बाब संबंधितांनी लक्षात घेणे आवश्यक आहे. पशुवैद्यकीय क्षेत्रात अश्या संधी उपलब्ध होणार असतील तर त्यांना विरोध करणे हे योग्य आहे का? असा थेट सवाल डॉ सागर आरुटे उपस्थित केला आहे, पशुपालक, मेंढपाळ, कुक्कुट व्यवसायिक व किंमती गोधन यांना आधुनिक पशुवैद्यकीय सेवे पासून वंचित ठेवल्या सारखे होईल. तसेच ही सेवा विशिष्ट वर्गाच्या हातातच राहीली पाहिजे काय ? असा उलट प्रश्न डॉ, सागर आरुटे यांनी उपस्थित केला आहे, शासनाने कोणत्याही संघटनेच्या संपाला बळी न पडता, घेतलेल्या योग्य निर्णयाची तातडीने अंमल बजावणी करावी अन्यथा पशुवैद्यकीय पशुसंवर्धन व दुग्ध व्यवस्थापन सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने व राज्यातील तमाम पदाधिकारी आणि पदविकाधारक पशुवैद्यक आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरून राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा व भुमिकेत असल्याचे आवाहन डॉ सागर आरुटे यांनी व्यक्त केले आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.