सराफ व्यवसायिकांनी दक्ष राहून व्यवसाय करावा -सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काळे
By : Polticalface Team ,01-08-2023
अमोल गायकवाड -वडगाव निंबाळकर
बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथील सराफ व्यवसाय करणाऱ्या व्यवसायिकांनी अतिशय दक्ष राहून व्यवसाय करावा. व संशयित व्यक्ती आढळल्यास त्वरित वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशनशी संपर्क साधावा. यासाठी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी वडगाव निंबाळकर येथे सराफ व्यवसाय करणाऱ्या दुकानास भेट देऊन व्यवसायिकांनी आपला व्यवसाय करीत असताना अतिशय दक्ष राहून व्यवसाय करावा अशा पद्धतीचे आव्हान केले आहे.
यावेळी वडगाव निंबाळकर येथील वाहन परवाना नसणाऱ्या वाहन चालकांवर देखील होळ चौकात कारवाई केली आहे.
यावेळी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी पोपट नाळे,संतोष जावेर,अमोल भुजबळ ,आबा जाधव, हवालदार मनेर उपस्थित होते.
वाचक क्रमांक :