बारामती तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सलग तिसऱ्यांदा हेमंत गडकरी यांची निवड

By : Polticalface Team ,03-08-2023

बारामती तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सलग तिसऱ्यांदा हेमंत गडकरी यांची निवड बारामती : मराठी पत्रकार परिषद मुंबई व पुणे जिल्हा पत्रकार संघ संचलित बारामती तालूका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी हेमंत गडकरी यांची सलग तिसऱ्यांदा तर उपाध्यक्षपदी संभाजी काकडे, तर सचिवपदी संदिप आढाव यांची तर कार्यकारिणी सदस्य पदी शाई नामाचे प्रतिनिधी अमोल गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी राहुल शिंदे व सह निवडणूक निर्णय अधिकारी भरत निगडे यांनी निवड जाहीर केली. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख सर यांच्या आदेशानुसार,मराठी पत्रकार परिषद अध्यक्ष शरद पाबळे, मराठी पत्रकार परिषद राज्य निवडणूक प्रमुख बाळासाहेब ढसाळ ,पुणे विभागीय सचिव अरुणनाना कांबळे, परिषद प्रतिनिधी एम.जी. शेलार यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार व पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर यांच्या आवाहनानुसार बारामती तालुका पत्रकार संघाची निवडणूक जाहीर झाली होती. त्यानुसार बारामती तालुका मराठी पत्रकार परिषदेची द्वैवार्षिक निवडणूक प्रक्रिया मोरगाव येथील शिवांकूश मंगल कार्यालयात पार पडली. सकाळी अकरा वाजता निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. अध्यक्षपदासाठी हेमंत गडकरी, उपाध्यक्ष पदासाठी संभाजी काकडे, सचिव पदासाठी संदिप आढाव, कार्याध्यक्ष पदासाठी सचिन पवार खजिनदार पदासाठी बाळासाहेब बालगुडे , कार्यकारण सदस्य पदासाठी आसिफ शेख, अमोल गायकवाड यांची नियोजित वेळेत प्रत्येकी एक अर्ज आल्याने सर्वांची बिनविरोध निवड करण्यात आली. पत्रकार हल्ला विरोधी समितीच्या निमंत्रक पदी राजेश वाघ, जिल्हा प्रतिनिधी म्हणून चिंतामणी क्षिरसागर, वसंत मोरे यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली. यावेळी अशोक वेदपाठक, योगेश भोसले, मनोहर तावरे, प्रशांत धुमाळ, विजय भोसले, सतिश गावडे, ॲड. अमर वाघ, प्रशांत धुमाळ, सुनील जाधव, संतोष चौधरी आदी बारामती तालुक्यातील पत्रकार सदस्य उपस्थित होते. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे मराठी पत्रकार परिषद, मुंबई व पुणे जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी