13 ऑगस्ट 2023 रोजी महाष्ट्राच्या 36 जिल्ह्यात एकाचवेळी वृक्षारोपण व प्रबोधन कार्यक्रम.... मौर्य क्रांती महासंघ
By : Polticalface Team ,03-08-2023
अमोल गायकवाड -वडगाव निंबाळकर
30जुलै 2023रोजी मौर्य क्रांती महासंघ महाराष्ट्र राज्य शाखेची जालना याठिकाणी राज्य स्तरीय बैठक संपन्न झाली. राज्यभरातून उपस्थित झालेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या या बैठकीत अनेक महत्वपूर्ण अशा धनगर बहुजन समाजाच्या ज्वलंत प्रश्नावर चर्चा झाली. त्यासोबतच सर्वानुमते निर्णय घेण्यात आला की यावर्षाचा लोकमाता पु. अहिल्यामाई होळकर यांचा 13ऑगस्ट हा स्मृतीदिन लोकमाता पु. अहिल्या माई होळकरांच्या विचारांचा , त्यांच्या कार्य सिद्धांताला अनुरूप असा कृतिशील कार्यक्रम आपण संपूर्ण महाराष्ट्राला दिला पाहिजे. या विषयावर सखोल चिंतन करत संपूर्ण महाराष्ट्रात ज्या विविध धनगर आणि बहुजन समाजात जागृती घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या समाज संघटना आहेत त्यांना सोबत घेऊन आपण अहिल्या माई होळकर यांचा स्मृती दिवस यादगार बनवला पाहिजे, यावर सर्वांमध्ये एकमत झाले.
आणि त्यातून संपूर्ण महाराष्ट्रात एकाचवेळी गावं, तालुका, जिल्हा आणि राज्य पातळीवर पर्यावरण रक्षक लोकमाता पु.अहिल्या माई होळकर यांच्या स्मृती दिना निमीत्त वृक्षारोपन व प्रबोधन कार्यक्रम करण्याचे निश्चित करण्यात आले.
या भूमिकेचे सर्वांनी स्वागत केले.
13ऑगस्ट 2023रोजी धनगर आणि समस्त बहुजन समाजाची जी लोकदैवते आहेत. त्या त्या स्मृतीस्थळाच्या ठिकाणी म्हणजे बिरोबा, खंडोबा, भैरोबा, विठोबा, म्हसोबा, तसेच राज्यभरातील अनाथ आश्रम, वृद्धाश्रम असतील किंवा बहुजन महापुरुष यांच्या पद स्पर्शाने पावन झालेली ठिकाणे असतील, गड किल्ले, स्मृतीस्थळे असतील त्या त्या ठिकाणी वृक्षारोपण करून पर्यावरण रक्षक लोकमाता पु अहिल्यामाई होळकर यांचा संदेश समाज मनात प्रत्यक्ष कृतीतून रुजवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी त्या त्या भागात कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.
यासाठी मौर्य क्रांती महासघाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी स्थानिक पातळीवर गावचे सरपंच आणि बहुजन समाजातील विविध सेवाभावी संस्था,आणि संघटना यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचेशी प्रत्यक्ष संवाद साधून वृक्षारोपण व प्रबोधन कार्यक्रमाचे नियोजन करत असल्याचे
मौर्य क्रांती महासंघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष डॉ दत्तात्रय भरणे. मोर्य क्रांती महासंघाचे प्रचारक डॉ प्रवीण जगताप डॉ प्रशांत साळवे डॉ रमजान तांबोळी डॉ परमेश्वर वेवहारे यानी कळवले आहे.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
भविष्यात मृत्यू नंतर मानवी शरीर शासन संपती म्हणून जाहीर करण्याची आवश्यकता आमदार राहुल कुल.
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2. या अभियानात न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव विद्यालयाला तालुक्यात तृतीय क्रमांकाचे बक्षीस.
प्राविण्य प्राप्त खेळाडूंचे प्रमाणपत्र न मिळाल्याने खेळाडू व शिक्षक हवालदिल , स्पर्धा आयोजनाचा निधीही प्रतिक्षेत
स्टेट बँक ऑफ इंडिया व्यवस्थापकांची श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयास भेट
नागपूर हिवाळी अधिवेशनात आमदार राहुल कुल यांनी दौंड तालुक्यातील विविध विषयांवर महत्वाचे मुद्दे मांडले.
कुकडीचे रब्बी आवर्तन उद्या पासून सुरू,,,,,,, आमदार नारायण आबा पाटील यांची माहिती
शिक्षक भारतीच्या वतीने शिक्षण उपसंचालक हरून आत्तार यांचा सन्मान, प्रलंबित प्रश्नांसंदर्भात सकारात्मक चर्चा
तालुकास्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धेत PM SHRI जि. प. शाळा,श्रीगोंदा मुले शाळेचे घवघवीत यश
लिंपणगाव -काष्टी रेल्वे गेटच्या उड्डाणपुलाबाबत आमदार खासदारांनी लक्ष घालावे; प्रवासी व वाहन चालकांची मागणी
न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव च्या माजी विद्यार्थ्याचे चित्रपट क्षेत्रात पदार्पण.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी कार्यकाळ वाढवून द्या प्रशिक्षणार्थ्यांची मागणी....सेवेत रुजू राहण्यासाठी कार्यकाळ वाढवा मुख्यमंत्री लाडक्या बहीण भावांची मागणी...
आमदार विक्रमसिंह पाचपुते यांची पेढेतुला करून वांगदरीत केला आनंद साजरा.
मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा श्री गणेशा मराठी चित्रपट २० डिसेंबरला होणार प्रदर्शित...
महात्मा फुले नूतन महाविद्यालयात आंतर विभागीय नेटबॉल स्पर्धा संपन्न.
संविधान प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या मनुरुग्नावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. परभणी हिंसाचार प्रकरणी हवेली तालुका आर पी आय आक्रमक.
आमदार सत्यजित तांबे हे सुधीर तांबे यांचा वारसा पुढे चालवत आहेत - बाजीराव कोरडे .
नशीब बलवत्तर म्हणून शेतकरी श्री नेटवटे हे बिबट्याच्या हल्ल्यातून बालंबाल बचावले ! लोणी व्यंकनाथमध्ये बिबट्याची दहशत कायम
परभणी येथील सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कोठडीतील मृत्यू प्रकरणी जबाबदार पोलिसांना बडतर्फ करावे - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले.
महायुती ला साथ दिली तरी ही रिपब्लिकन पक्षाला मंत्रिमंडळात न्याय मिळाला नाही - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले.
श्री क्षेत्र माळवाडी पडवी येथे दत्त जयंती सोहळा उत्साहात संपन्न. दौंड तालुक्यातील भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती.