के.पी.जाधव हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज चिंभळे येथे महसूल सप्ताह निमित्त विद्यार्थ्यांची साधला युवा संवाद
By : Polticalface Team ,04-08-2023
के.पी.जाधव हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज चिंभळे येथे महसूल सप्ताह निमित्त चिंभळे विभागाचे मंडलअधिकारी श्री सदाफुले साहेब व चिंभळे ग्रामचे ग्राम तलाठी श्री भांबरे साहेब यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना विविध विषयावर मार्गदर्शन करून संवाद साधला.
यामध्ये प्रामुख्याने विद्यार्थ्यांनी स्वतःच्या शेतामध्ये पिकाची नोंद मोबाईल ॲप द्वारे कशी लावायची, नवीन मतदार नोंदणी, विविध प्रकारचे दाखले, विद्यार्थ्यांकरीता विविध शिष्यवृत्ती योजना, आधार कार्ड दुरुस्ती, पंतप्रधान पिक विमा योजना, शेत रस्ते व गावातील वाद मिटवणे अशा विविध विषयांवर मंडळ अधिकारी श्री सदाफुले साहेब यांनी माहिती दिली. यावेळी कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. श्री सचिन जाधव सर कामगार तलाठी झोडे साहेब महाविद्यालयाचा सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व परिसरातील पालक उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राध्यापक श्री संदीप देवकर सर यांनी केले तर महाविद्यालयाचे प्राचार्य श्री जालिंदर मोहिते सर यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले.
वाचक क्रमांक :