करमाळा बस आगारात वाढीव एसटी बसेसची माजी आमदार नारायण पाटील यांनी केली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

By : Polticalface Team ,04-08-2023

करमाळा बस आगारात वाढीव एसटी बसेसची माजी आमदार नारायण पाटील यांनी केली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करमाळा प्रतिनिधी करमाळा बस आगारात वाढीव एस टी बसेसची मागणी केली असून प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना करमाळा आगारातील प्रलंबित प्रश्नांवर व मागण्यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी मुख्यमंत्री यांना एका निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत अधिक माहिती देताना माजी आमदार पाटील यांनी सांगितले की करमाळा तालूक्यातील 115 गावांमध्ये दळणवळणासाठी लालपरी पोहचली जावी, गाव तिथे एस टी ही संकल्पना प्रत्यक्षात अवलंबली गेली पाहिजे. आज तालूक्यात जवळपास 50 हायस्कूल आहेत तर काही करमाळा व जेऊर येथे महाविद्यालय कार्यरत आहेत. करमाळा तालुक्यातील हजारो विद्यार्थी आपले गाव सोडून इतर गावी जिथे हायस्कूल अथवा महाविद्यालयात शिक्षणासाठी प्रवास करत असताना त्यांना एस टी बसची सोय उपलब्ध करून देण्यात आली पाहिजे.आज किती तरी गावात फक्त एकदाच एस टी येते व यानंतर त्या गावात कोणतीही बसगाडी येत नाही. हि वस्तुस्थिती असुन आता विद्यार्थी व रुग्ण तसेच जेष्ठ नागरिक आणि शेतकरी यांना दळणवळणाची सुविधा मिळाली पाहिजे . एकीकडे जेष्ठ नागरिकांना व महिलांना अर्धे तिकीट काढून प्रवास करता येतो. परंतू केवळ आपल्या रहिवासी गावात एस टी नसल्याने या चांगल्या सवलती पासून सदर लाभार्थ्यांना मुकावे लागत आहे. करमाळा आगारात एस टी गाड्यांची संख्या कमी असल्याने ही समस्या प्रलंबित कायम तशीच राहीली आहे. सोलापूर जिल्ह्यातील तालुका पातळीवर असलेल्या इतर आगारातील बस संख्या कमी आहे तरी तालूकातर्गत तसेच तालूक्याबाहेर इतर शहरे तसेच हाॅस्पिटल, काॅलेजेस, धार्मिक स्थळे, पर्यटन स्थळ व शासकीय कार्यालये या ठिकाणी जाता यावे म्हणून करमाळा आगारात एस टी बस संख्येत वाढ करावी ही मागणी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे केली असून लवकरच प्रत्यक्ष भेटून दळणवळणाचा हा प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी सांगितले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी