विमा प्रतिनिधी अजित दळवी यांना एमडीआरटी पीडीआरटी शतकवीर बहुमान
By : Polticalface Team ,05-08-2023
लिंपणगाव (प्रतिनिधी)-- लोणी व्यंकनाथ येथील भारतीय आयुर्विमा महामंडळाचे श्रीगोंदा शाखेचे आघाडीचे विमा प्रतिनिधी श्री अजित दळवी यांनी गेल्या आर्थिक वर्षात विमा क्षेत्रात महत्त्वाचा समजला जाणारा MDRT व शतकवीर तसेच या आर्थिक वर्षातील PDRT हा बहुमान मिळवला आहे. त्याबद्दल श्री अजित दळवी यांना दिनांक 4 ऑगस्ट रोजी पुणे येथील हॉटेल ग्रँड शेरेटन येथे भारतीय आयुर्विमा महामंडळाचे पश्चिम विभागाचे क्षेत्रीय प्रबंधक श्री सेनगुप्ता साहेबांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. अजित दळवी यांनी एमडीआरटी हा सन्मान सलग दुसऱ्या वर्षी मिळवला आहे. आपल्या देशातील ग्रामीण भागात अजूनही विम्याचा म्हणावा तसा प्रसार झालेला नाही. श्रीगोंदा तालुक्यासारख्या ग्रामीण भागात जीवन विमा व आरोग्य विम्याची जागृती करण्याचे व प्रसार करण्याचे महत्त्वाचे काम श्री अजित दळवी यांनी केले आहे. अजित दळवी हे गेली 16 वर्ष या व्यवसायात आहेत, त्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण कामगिरीतून त्यांनी लोणी व्यंकनाथ गावाला आदर्श विमाग्राम हा बहुमान मिळवून 50000/रुपयांचा चेक गावच्या विकासासाठी दिला आहे. त्यांना या कामासाठी भारतीय आयुर्विमा महामंडळाचे शाखा अधिकारी श्री प्रवीणकुमार कुलकर्णी साहेब तसेच विकास अधिकारी श्री अशोक गदादे साहेब यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.
वाचक क्रमांक :