काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा श्रीगोंद्यात जिल्हा काँग्रेस व जिल्हा युवक काँग्रेस कडून जल्लोष साजरा

By : Polticalface Team ,05-08-2023

काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा श्रीगोंद्यात जिल्हा काँग्रेस व जिल्हा युवक काँग्रेस कडून जल्लोष साजरा

लिंपणगाव (प्रतिनिधी) काल मा. सुप्रीम कोर्टाने मा.राहुल गांधी यांच्या दोन वर्षाच्या शिक्षेला दिली स्थगिती देऊन मोदी सरकारला चपराक दिली. मा. राहुल गांधीना सुप्रिम कोर्टातून न्याय मिळाला असुन राहुलजी गांधी यांची खासदारकी सुद्धा पुन्हा मिळणार आहे. जनतेचा आवाज संसदेत बुलंद करणार आहेत. सत्याचा विजय झाल्याबद्दल राज्याचे विधिमंडळ पक्ष नेते मा.मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर जिल्हा काँगेस व जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने व काँगेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे यांच्या नेतृत्वात शनी चौक, श्रीगोंदा.येथे अहमदनगर युवक काँग्रेसच्या वतीने बैंड बाजा, लाडू वाटप करून व फटाके फोडून जल्लोष करण्यात आला* *यावेळी अहमदनगर काँग्रेसचे जिलाध्यक्ष राजेंद्र नागवडे म्हणाले सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा राहुल गांधी यांच्या बाजूने लागला असून एक प्रकारे हुकूमशाहा मोदी सरकारला सुप्रीम कोर्टाने चपराक दिली आहे हा विजय न्यायदेवतेचा असून त्याचे आम्ही स्वागत करतो. सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नाही.* *यावेळी जिल्हा युवकचे अध्यक्ष स्मितल वाबळे म्हणले की* *मोदी शेठ सर्व काही विकत घेऊ शकतो,आणि जे 70 वर्षात काँग्रेसने कमावलं ते विकू शकतो, परंतु देशांमध्ये संविधान जिवंत आहे. संविधान विकू शकत नाही न्यायव्यवस्था विकत घेऊ शकत नाही म्हणून मोदी साहेब चे अधिपत्त्ये खाली असलेले गुजरात कोर्टने दिलेला निकाल रद्द करुन, आज सर्वोच्च न्यायालयाने सत्याला न्याय दिला* देशाचे राष्ट्रीय नेतृत्व आदरणीय राहुल गांधी यांना सुप्रीम कोर्टाने न्याय दिल्या बद्दल श्रीगोंदा तालुका काँग्रेस कमिटी व युवक यांनी आनंद उत्सव साजरा केला. यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रशांत ओगले, शहराध्यक्ष मनोहर पोटे,नागवडे कारखान्याचे संचालक प्रशांत दरेकर, विठ्ठल जंगले,मल्लूभाई शेख, सुनील जंगले, विकास काळे, कांतिलाल कोकाटे, मुकुंद सोनटक्के,प्रमोद शिंदे, अशोक आळेकर, पोपटराव बोरुडे, मधूकर काळाने, सुरेश पवार,भूषण शेळके, धीरज खेतमाळीस व इतर सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आभार श्रीगोंदा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा धर्मनाथ काकडे यांनी यांनी मानले .

कोहलेर पावर इंडिया कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून इंदिरा गांधी पॉलिटेक्निक बेलवंडी (शुगर) ५० कॉम्प्युटर, लॅपटॉप, वॉटर कुलर व मोठे झेरॉक्स मशीन भेट.

स्वर्गीय आमदार सुभाष आण्णा कुल यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवत आहे. आमदार राहुल कुल.

एनडीए सरकारच्या वाचाळवीरांवर तात्काळ गुन्हे दाखल करा:- युवक काँग्रेस

सहकार महर्षी बापूंनी सहकाराच्या माध्यमातून श्रीगोंदा तालुका सुजलाम सुफलाम केला - प्रसिद्ध व्याख्याते गणेशजी शिंदे

मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री बुधवारी सोलापुरात! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा; 40,000 महिलांना कार्यक्रमासाठी आणायला 400 बसगाड्या

स्वामी चिंचोली येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

वडगाव शेरी मतदार संघाचे माजी आमदार बापूसाहेब पठारे, त्यांचे चिरंजीव सुरेंद्र पठारे व तीन माजी नगरसेवकांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश

लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत

शरद पवारही माझ्याकडे बघून हसू लागले; अशोक सराफांनी सांगितला सुप्रिया सुळेंच्या लग्नातला विनोदी किस्सा

स्वर्गीय सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे बापू यांच्या पुण्यस्मरणानिमित्त उद्या वांगदरी येथील अंबिका मातेचे मंदिरात व्याख्यान        

स्वाभिमानी मराठा महासंघाच्या राज्य निरीक्षक पदी भानुदास वाबळे यांची नियुक्ती

यवत येथील गणेश विसर्जन मिरवणूकीत कार्यकर्ते झिंग झिंगाट. मंडळांच्या प्रमुखांनमुळं विसर्जन पार. पोलीस प्रशासनाचे नियम धाब्यावर. मागच्या दाराने दारु विक्री

गिरीम गावच्या सरपंचपदी संगिता किसन मदने (पाटील)यांची बिनविरोध निवड

पो. कॉ.ज्ञानेश्वर मोरेच्या रुपात खाकीतला एक कोहिनूर हरपला

अजितदादांनी या मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद

इंदापूरमध्ये शरद पवारांकडून उमेदवारीसाठी आप्पासाहेब जगदाळे यांच्या समर्थकांच्या हालचाली.! संकटसमई धावून आलेल्या आप्पासाहेब जगदाळे यांना उमेदवारी मिळणार..?

लाडकी बहीण योजनेचा तिसरा हफ्ता महिलांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात पहा तारीख आणि वेळ

अरविंद केजरीवाल देणार राजीनामा, दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी कोण होणार विराजमान

पितृसेवा म्हणजेच भगवंताची उत्तम सेवा होय -सोमनाथ महाराज बारगळ

श्री व्यंकनाथ विद्यालयात शिक्षक- पालक मेळावा उत्साहात संपन्न