श्रीगोंद्यात मनिपुर अत्याचार घटना व संभाजी भिडे याने महापुरुषांबद्दल काढलेल्या अपशब्द निषेधार्थ अखिल भारतीय समाजातर्फे निषेध सभा
By : Polticalface Team ,07-08-2023
लिंपणगाव (प्रतिनिधी) नुकतीच मनिपुर येथे घडलेली अमानवीय घटना, झालेला जातीय हिंसाचार व महिला भगिनींवर झालेले अत्याचार, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या बद्दल केलेले अशुभनीय व निंदनीय वक्तव्य, महात्मा फुले यांच्या विषयी केलेले अवमान कारक वक्तव्य, तसेच लाखो करोड लोकांचे श्रद्धास्थान असलेले साईबाबा यांच्या बद्दल केलेले वक्तव्य याचा जाहीर निषेध करिता श्रीगोंदा तालुक्यातील विविध सामाजिक संघटना व पदाधिकाऱ्यांनी निषेध सभा आयोजित करण्यात आली होती.
श्रीगोंदा येथे तहसील कार्यासमोर या निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी जिल्हा महिला काँग्रेसचे अध्यक्ष सौ अनुराधाताई नागवडे या होत्या. यावेळी उपस्थितांमध्ये नागवडे कारखान्याचे उपाध्यक्ष व ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस, घनश्याम शेलार, नगराध्यक्ष सौ शुभांगीताई पोटे,अॅड संभाजीराव बोरुडे, जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष स्मितल वाबळे, आदेश नागवडे, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रा धर्मनाथ काकडे, प्रशांत दरेकर, बाळासाहेब बळे, कांतीलाल कोकाटे, संजय आनंदकर संतोष खेतमाळीस, टिळक भोस, सुरेखा लकडे, चांगदेव पाचपुते, रंगनाथ बिबे यांच्यासह असंख्य महिला व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या निषेध सभेत आदिवासी समाजातील पाच महिलांचा सर्व धर्मियांतर्फे साडी चोळी देऊन सन्मानित करण्यात आलेहा मुद्दा बातमीच्या मध्यभागी घ्यावा.
याप्रसंगी या निषेध सभेत टिळक भोस, प्रा बाळासाहेब बळे, राहुल साळवे, नगराध्यक्ष शुभांगी पोटे, प्रशांत दरेकर, मुकुंद सोनटक्के, सुनीता दराडे, कांतीलाल कोकाटे, बंडू पंदरकर आदींनी मणिपूर महिलांवरील अत्याचार घटना तसेच माथेफिरू संभाजी भिडे यांनी महापुरुषांबद्दल काढलेल्या वक्तव्यात संदर्भात आपल्या भाषणातून तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत केंद्र व राज्य सरकारवर हल्ला चढवला.
यावेळी नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत म्हणाले की, या देशामध्ये सर्वसामान्य जनतेचे प्रश्न आणि अडचणी या प्रश्नांना बगल देऊन गलिच्छ राजकारण भाजप सरकार करत आहे. प्रत्येकाने आता निर्णय क्षमतेनुसार निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. लोकशाही देशांमध्ये भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर सेवा संस्था व इतर स्थानिक संस्थांच्या निवडणुका जाणीवपूर्वक थांबवल्या जात आहेत. आज देशामध्ये 13 लाख तीस हजार महिला बेपत्ता आहेत. केंद्रातील सरकार काय करत आहे. मणिपूर पेटले असून, फोडाफोडीचे राजकारण भाजपकडून केले जात आहे. देशात महिला सुरक्षित नाहीत. यासाठी सर्वांना एक विचाराने सामूहिक लढा द्यावा लागेल. घडल्या घटनेचा श्री नागवडे यांनी जाहीर निषेध व्यक्त केला.
ज्येष्ठ नेते घनश्याम शेलार यावेळी निषेध नोंदताना म्हणाले की, मणिपूर मध्ये घडलेली घटना अत्यंत निंदनीय असून, या विषयावर चिंतन करावे अशी स्थिती आहे. छत्रपती, शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र या दुर्दैवी घटनेत उठत नाही. लढा उभारण्याचे आवश्यकता असून, ही घटना अतिशय लाजिरवाणी आहे. माजी सैनिकाच्या पत्नीची दिंड काढली जात असताना केंद्र सरकार मात्र कायद्यानुसार वागत नाही. त्यामुळे आता सर्वांना वैचारिक निर्णय घ्यावा लागेल. असे सांगून मणिपूर व भिडे याच्या वक्तव्याचा शेलार यांनी निषेध केला.
ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस निषेध व्यक्त करताना म्हणाले ,मनिपुर घटनेचा निषेधार्थ अनेक महिलांनी सडेतोड मते मांडून तीव्र शब्दात निषेध नोंदवला .ही अभिमानास्पद बाब आहे. संभाजी भिडे सारखा माथे फिरू याचा एकत्रितपणे सामूहिकरीत्या विचार संपवावा लागेल. त्यासाठी समाज जागृतीची गरज आहे. असे भोस यांनी म्हटले आहे.
अध्यक्षीय भाषणात महिला काँग्रेस अध्यक्षा सौ अनुराधाताई नागवडे यावेळी निषेध नोंदवताना म्हणाल्या की, मणिपूरमध्ये जी अन्याय व अत्याचारी घटनेमुळे आता महाराष्ट्रात सुद्धा असे प्रकार घडू शकते. वेळीच हे प्रकार रोखण्याची गरज आहे महिलांवर देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर अन्याय अत्याचार घडत आहेत. त्यामुळे सर्वांचा सुरक्षितेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. पक्ष विरहित प्रत्येकाने सामूहिक लढ्याची गरज आहे. असे सांगून घडलेल्या घटनेचा सौ नागवडे यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.
सूत्रसंचालन प्रा धर्मनाथ काकडे व प्रशांत दरेकर यांनी केले आभार मुकुंद सोनटक्के यांनी मानले.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.