मणिपूर मध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा,संभाजी भिडे वर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून आटक करा या मागणीसाठी करमाळ्यात बहुजन संघर्ष सेनेची निदर्शने

By : Polticalface Team ,07-08-2023

मणिपूर मध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा,संभाजी भिडे वर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून आटक करा या मागणीसाठी करमाळ्यात बहुजन संघर्ष सेनेची निदर्शने करमाळा प्रतिनिधी : मणिपूर येथील हिंसाचाराच्या विरोधात व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा राजीनामा घ्यावा तसेच संभाजी भिडे वर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा म्हणून या या मागणीसाठी तहसील कचेरी करमाळा समोर बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम यांच्या नेतृत्वाखाली भव्य निदर्शने करण्यात आली कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला यावेळेस राजाभाऊ कदम आपल्या भाषणातून म्हणाले तीन महिने झाले मणिपूर मधील हिंसाचार चालू आहे हजारो घरे जाळली हजारो लोकांचा मृत्यू झाला हजारो लोकांच्या आया बहिणीची इज्जत लुटली तीन महिलांची नग्न करून हजारोच्या संख्येने धिंड काढून बलात्कार केले त्यातील एक महिला कारगिल युद्धातील माजी सुभेदाराची पत्नी होती या सर्व घटनेमुळे जगामध्ये भारत देशाची मान खाली गेली आहे एवढं सगळं घडून मणिपूर मध्ये राष्ट्रपती राजवट लागू का केली नाही तेव्हा पंतप्रधानांनी ताबडतोब मणिपूर मध्ये बीरेनसिंह सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करावी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हिंसाचार थांबवण्यात अपयशी ठरले गृहमंत्री अमित शहा यांचा राजीनामा घ्या माजी सैनिकाची पत्नी या देशात सुरक्षित राहू शकत नसेल तर या देशांमध्ये जंगल राज चालू आहे असे वाटते कारण हिंसा करणाऱ्या लोकांच्या हाता मध्ये बंदूक होत्या बंदुकांच्या गोळ्यांनी अनेक लोकांचे प्राण घेतले हिंसा रोकण्यामध्ये केंद्र सरकार सुद्धा आपयशी ठरले आहे . संभाजी भिडे भारताचा राष्ट्रध्वज तिरंग्यचा आवमान करतात , महात्मा गांधी, महात्मा ज्योतिबा फुले या महामानवा बरोबर शिर्डीचे साईबाबा यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य करतात यामुळे सर्व समाजामध्ये भिडे विरोधात संतापाची लाट निर्मान झाली आहे संभाजी भिडे वर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून अटक झाली पाहिजे ही आमची मागणी आहे . या वेळेस मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष सचिन काळे , बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हा सचिव आप्पा भोसले, हनुमंत खरात, यांची भाषणे झाली यावेळी उपस्थित पोंधवडीचे सरपंच कोडलिंगे, पोत्रेचे मा. सरपंच विष्णू रंधवे, उमरडचे माजी सरपंच संदीप पाटील, रेवण पाटील, शहाजी झिंजाडे, बहुजन संघर्ष सेनेचे तालुकाध्यक्ष अंगद लांडगे , करमाळा शहराध्यक्ष अजिनाथ कांबळे, बहुजन संघर्ष सेनेचे शहर सचिव कालिदास कांबळे, बहुजन संघर्ष सेनेचे तालुका उपाध्यक्षा तुकाराम घोंगडे, काँग्रेसचे भगवान डोंबाळे, गफूर भाई शेख, सुनील गरड, मारुती भोसले, महादेव भोसले, सचिन चितारे, कचरू जगदाळे, महिंद्रा जगदाळे, अधिक शिंदे, निखिल गरड, राहुल गरड, नागा कांबळे, बापू भोसले, सुरेश जाधव, राहुल खरात, संतोष चव्हाण, प्रेमचंद कांबळे, अंकुश जाधव, रामा पांडव, बटू हजारे, कालिदास लुचारे, मच्छिंद्र काळे, मच्छिंद्र गायकवाड, राजू शिंदे, निवास चौधरी, लियाकत शेख, भागवत कदम, आबा कदम, रमेश कदम आधी शेकडो कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष