इंडियन असोसिएशन ऑफ फिजिओ थेरपिस्टचा उत्कृष्ट महिला फिजिओ पुरस्कार डॉ.मृण्मयी अवचट यांना प्रदान

By : Polticalface Team ,12-08-2023

इंडियन असोसिएशन ऑफ फिजिओ थेरपिस्टचा उत्कृष्ट महिला फिजिओ पुरस्कार डॉ.मृण्मयी अवचट यांना प्रदान दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, इंडियन असोसिएशन ऑफ फिजिओथेरपिस्ट उत्कृष्ट महिला फिजिओ पुरस्कार प्रदान वितरण सोहळा नुकताच कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया, नवी दिल्ली येथे पार पडला असून यावेळी आय.ए.पी महिला सेलच्या पहिल्या राष्ट्रीय परिषदेत महाराष्ट्रातील एकमेव डॉ.मृण्मयी विवेक अवचट यांना उत्कृष्ट महिला फिजिओ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. इंडियन असोसिएशन ऑफ फिजिओथेरपिस्ट (IAP) च्या महिला सेल कॉन्फरन्समध्ये भारतीय जनता पार्टी जम्मू-काश्मीरचे खासदार गुलाम अली खताना, जी 20 ऑपरेशनल हेड साक्षी वर्मा व जागतिक फिजिओथेरपीचे अध्यक्ष प्रा. मिशेल लँड्री यांच्या हस्ते डॉ.मृण्मयी अवचट यांना "उत्कृष्ट महिला फिजिओ" म्हणून सन्मानित करण्यात आले. हा कार्यक्रम मोदीजींच्या फिट इंडियाचा एक भाग होता, डॉ.मृण्मयी विवेक अवचट MPTh (एमपी.टीएच -अस्थिरोग - क्रीडा ) MMCP.MIAP.FOMT (ऑस्ट्रेलिया)(परस्युइंग) पदवी प्राप्त केले असून सिम्बायोसिस युनिव्हर्सिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, पुणे येथे विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहेत डॉ.मृण्मयी अवचट यांना २०१७ रोजी तेजस्विनी मंच मार्फत तात्कालीन महापौर मुक्ता टिळक व आमदार माधुरी मिसाळ, नगरसेविका मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते नवदुर्गा शक्ती पुरस्कार, २०१८ मध्ये टिळक महाराष्ट्र विद्यापीठ यु.जी संस्थेद्वारे फिजिओ थेरपी क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल "सर्वोत्कृष्ट प्रख्यात अल्युमी" पुरस्कार २०२१ रोजी देऊन सन्मानित करण्यात असून कोरोना काळात त्यांनी कर्वे रोड येथील संजीवन रुग्णालयात मुख्य वरिष्ठ फिजिओ थेरपिस्ट सल्लागार म्हणून काम केले असून डॉ.मृण्मयी अवचट यांनी ऑस्टियोपॅथी आणि मॅन्युअल थेरपी (एफओएमटी) (ऑस्ट्रेलिया) मध्ये फेलोशिप राजीव गांधी आरोग्य विज्ञान विद्यापीठ, बंगलोर (कर्नाटक) बेंगलोर येथे एमपीटी (अस्थिरोग आणि स्पोर्ट्स) महाविद्यालयात कायम १ ल्या व ३ ऱ्या क्रमांकावर राहिला,तर टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे येथे बीपीटी मध्ये पदवी प्राप्त केले असुन, गेल्या १३ वर्षापासून कार्यरत आहेत यामध्ये सिम्बायोसिस युनिव्हर्सिटी हॉस्पिटल रिसर्च सेंटर, पुणे येथे विभाग प्रमुख (HOD) म्हणून सामान्य रुग्णालय आणि विशेष विभागासाठी संपूर्ण विभाग स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे तर यापूर्वी एमजेएम हॉस्पिटल येथे भौतिकशास्त्र तज्ञ सल्लागार म्हणून तर संजीवन हॉस्पिटल पुणे येथे मुख्य फिजिओ विभागाचे सर्वांगीण कल्याण, रुग्ण आणि प्रशासनाचा दर्जा सुधारणे या सारख्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत तसेच सामाजिक उपक्रमात देखील सहभाग घेत असून डिसेंबर २०१६ मध्ये पुणे मॅरेथॉन कॅम्प, नोव्हेंबर २०१९ मध्ये गरजू रुग्णांसाठी आयोजित केलेल्या जॉइंट रिप्लेसमेंट कॅम्प मध्ये १५० रुग्णांना हाडांच्या समस्यांबाबत फायदा झाला,२०१५ मध्ये बारामतीतील वंचित रुग्णांसाठी मोफत ऑर्थो आणि फिजिओथेरपी कॅम्प, सुतारदरा परिसरात मोफत ऑर्थो आरोग्य तपासणी शिबीर २०२२ मध्ये महिला दिनानिमित्त कोथरूड परिसरातील वंचित महिलांसाठी आरोग्य आठवडा शिबिर, "सुरक्षित रुग्ण काळजी हाताळणी सल्ला आणि महिलांच्या आरोग्या विषयी जागरूकता" या विषयावर अर्गोनॉमिक जागरूकता चर्चासत्र, मार्च२०२१ मध्ये पुणे येथील एमआयएम रुग्णालयात महिला दिनानिमित्त आरोग्य सेवा व्यावसायिक शिबिर,सुरक्षित रुग्ण काळजी यावर अर्गोनॉमिक जागरूकता चर्चा सत्र, मे २०२१ मध्ये नर्सिंग डे निमित्ताने सर्व नर्सिंग स्टाफसाठी "हाताळणी सल्ला" आदि सार्वजनिक सहभाग घेतला आहे. पुरस्कार मिळाल्याबद्दल मनोगत व्यक्त करताना पालकांचा बिनशर्त प्रेम व पाठिंब्यामुळे तसेच गुरु डॉ.उज्ज्वल येवले यांच्या मार्गदर्शनामुळे व सहकार्यामुळे हे शक्य झाले असून या अशा आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात सन्मानित केल्याबद्दल डॉ.संजीव झा व डॉ. रुची वार्ष्णेय यांचे आभार व्यक्त केले तर यापुढील देखील अशाच प्रकारे समाजकार्य व रुग्णांची सेवा करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल असे डॉ.मृण्मयी अवचट यांनी सांगितले,
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष