लिंपणगाव( प्रतिनिधी) -11ऑगस्ट रोजी न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव येथे मढेवडगाव केंद्रांतर्गत केंद्रस्तरीय शासकीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते केंद्रातील सर्व जिल्हा परिषद व माध्यमिक शाळेतील मुलांनी यामध्ये सहभाग घेतला. वयोगटा नुसार देण्यात आलेल्या विषयांची मुलांनी उत्साहाने व चांगल्या पद्धतीने चित्र काढले. यावेळी केंद्राचे केंद्रप्रमुख सय्यद जावेद व इतर शिक्षकांनी या परीक्षेचे चांगले नियोजन केले होते.सर्व विद्यार्थ्यांना सूचनेप्रमाणे चित्र काढण्यासाठी कागद साहित्य वाटप करण्यात आले होते. बैठक व्यवस्थेसाठी हायस्कूलच्या मुख्याध्यापक व सहकारी शिक्षकांनी मदत केली. दोन तासाच्या वेळेत मुलांनी आपल्या कल्पनेप्रमाणे दिलेल्या विषयावर सुरेख व सुंदर चित्र काढलेले दिसून आले. त्यामुळे त्यांना या कलेचा आस्वाद घेता आला.
वाचक क्रमांक :