लोणी व्यंकनाथ येथील नूतन जिल्हा परिषद शाळेच्या आवारातील विद्युत वहिनीचे स्थलांतर करा , अन्यथा स्वातंत्र्य दिना दिवशी झेंडावंदन कार्यक्रमावर विद्यार्थी, पालक बहिष्कार घालून आंदोलन करणार

By : Polticalface Team ,12-08-2023

लोणी व्यंकनाथ येथील नूतन जिल्हा परिषद शाळेच्या आवारातील विद्युत वहिनीचे स्थलांतर करा  

,  अन्यथा स्वातंत्र्य दिना दिवशी झेंडावंदन कार्यक्रमावर विद्यार्थी, पालक बहिष्कार घालून आंदोलन करणार  लिंपणगाव (प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथील स्थलांतर होणाऱ्या नूतन जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणातील विद्युत वाहिनीचे पोल स्थलांतरित करावेत, अशी मागणी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश काकडे यांनी संबंधितांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे. संबंधितांना पाठवलेल्या निवेदनात श्री काकडे यांनी म्हटले आहे की, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या जुन्या इमारतीचे निर्लेखन मंजूर झाले असून, पाच वर्षांपूर्वी शाळेची 2020- 21 यावर्षी चार खोल्यांची नवीन इमारत सर्व शिक्षा अभियानांतर्गत तसेच ग्रामपंचायत लोणी व्यंकनाथ चौदावा वित्त आयोगातून एक खोली व जिल्हा नियोजन आराखड्यातून एक खोली असे सहा वर्ग खोल्यांचे काम पूर्ण झालेले आहे. या निधीतून सुसज्ज इमारत तयार आहे. परंतु इमारतीच्या समोरील आवारातून ३३ के व्ही ची मुख्य विद्युत वाहिनी गेलेली असल्यामुळे पालकांचा नवीन शाळा इमारतीत स्थलांतर करण्यास पूर्णपणे विरोध आहे. दरम्यान शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश काकडे यांनी या निवेदनात आणखी पुढे म्हटले आहे की, विद्युत वाहिनी स्थलांतरित करणे बाबत अनेक वेळा महावितरण कंपनी जिल्हा परिषद यांच्या पातळीवर पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला आहे. परंतु कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने शेवटी पालक तीव्र आंदोलनाच्या तयारीत आहेत. जर दिनांक 14 ऑगस्ट 2023 पर्यंत सदरची विद्युत वाहिनी स्थलांतरित झाली नाही, तर दिनांक 15 ऑगस्ट 2023 रोजी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी झेंडावंदन कार्यक्रमावर बहिष्कार घालून सकाळी आठ वाजता शाळेतील सर्व विद्यार्थी व पालक नगर दौंड रोड एन एच 160 रस्त्यावर लोणी व्यंकनाथ येथे रस्ता रोको आंदोलन करणार आहे. या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी संबंधित खात्याची राहील असे या निवेदनात शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश काकडे यांनी म्हटले आहे. या निवेदनाच्या प्रति खासदार, आमदार, तहसीलदार, पोलीस श्रीगोंदा, उपकार्यकारी अभियंता विद्युत मंडळ, गटविकास श्रीगोंदा, गटशिक्षणाधिकारी श्रीगोंदा, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, अधीक्षक अभियंता विद्युत मंडळ, जिल्हा अधीक्षक अहमदनगर आदींना पाठवण्यात आले आहेत. अशी माहिती शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष अविनाश पांढरे व सदस्य सुनील पाटील यांच्यासह समितीच्या सर्व सदस्यांनी स्वातंत्र्यदिनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी