विधी साक्षरता शिबिराच्या माध्यमातून जीवनाचा कायापालट होवू शकतो - न्यायाधीश महेश जाधव

By : Polticalface Team ,17-08-2023

विधी साक्षरता शिबिराच्या माध्यमातून जीवनाचा कायापालट होवू शकतो - न्यायाधीश महेश जाधव लिंपणगाव (प्रतिनिधी) -विधी साक्षरता शिबिरातून जीवनाचा कायापालट होवू शकतो असे प्रतिपादन महेश जाधव जिल्हा न्यायाधीश -१ व सत्र न्यायाधीश श्रीगोंदा यांनी केले आहे ते श्रीगोंदा येथील शारदा विद्या निकेतनच्या एन.एस.गुळवे ज्युनिअर कॉलेज मध्ये आयोजित केलेल्या तालुका विधी सेवा प्राधिकरण व वकील संघ यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय युवक दिना निमित्त विधी साक्षरता शिबिर आयोजित करण्यात आले होते त्या प्रसंगी न्यायाधीश जाधव बोलत होते.न्यायधधीश जाधव यांनी पुढे सांगितले की पालकांनी मुलांच्या हाती दुचाकी गाडी देवू नये. प्रत्येकाने गाडी चालवताना मनावर ताबा असणे आवश्यक असून गाडीचा वेग किती आहे हे पाहिले पाहिजे कारण आपला जीव धोक्यात घालून दुसऱ्याचा ही जीव धोक्यात घालून नये.अशा गोष्टींमुळे दोन्हीही कडील पालकांना जेल मध्ये जावे लागते,तरुण पिढी चांगली आहे पण त्यांना योग्य मार्गदर्शन करणे गरजेचे आहे असे ही न्यायाधीश जाधव यांनी सांगितले. यावेळी जी.एम.साधले सह दिवानी न्यायाधीश व स्तर तथा अति मुख्य न्याय दंडाधिकारी श्रीगोंदा यांनी सांगितले की ज्या वेळी आपण घर सोडून बाहेर पडतो त्यावेळी आपल्याला सुरक्षित वातावरण मिळेल हे सांगता येत नाही.मी सिनियर आहे त्यामुळे ज्युनिअर त्यांना जाणून बुजून त्रास दिला जातो या पाठीमागे स्व: ताचे मनोरंजन कसे होईल हेच पाहिले जाते.रॅगिंग रोखण्यासाठी कायदा असून मुला -मुलींनी संबंधित प्राचार्य यांना सर्व प्रथम माहिती द्यावी किंवा पोलिस स्टेशनला तक्रार दाखल करा.विनापरवाना गाडी चालवू नये.गाडी चालवताना मोबाईलचा वापर करू नये असे ही न्यायाधीश साधले यांनी सांगितले. ॲड.एस.एस.मोटे जिल्हा अध्यक्ष कर्जत जामखेड वकील संघ यांनी सांगितले की प्रत्येकाने वाहतुकीचे काळजी पूर्वक नियमांचे पालन करून हेल्मेटचा वापर करणे, दुचाकीवरून फक्त दोनच व्यक्तींनी प्रवास करावा असे ही ॲड.मोटे यांनी सांगितले. ॲड.अशोक रोडे अध्यक्ष श्रीगोंदा तालुका वकील संघ यांनी सांगितले की रॅगिंग सारखा प्रकार झाल्यास गुन्हे दाखल केले जातात. या कार्यक्रमाला निलकंठ बोरूडे विस्तारधिकारी पंचायत समिती श्रीगोंदा, ॲड.सुनिता पलिवाल, ॲड.अनिता घोडके, ॲड.नागवडे,शारदा विद्या निकेतनचे संस्था विश्वस्त डॉ.अशोक खेंडके, प्राचार्य बी.टी.मखरे,प्रा.आशा सुद्रिक,प्रा.कांचन कोरडे,प्रा.राम सोनवणे आदि मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विजय काटे यांनी तर उपस्थितांचे आभार प्राचार्य बी.टी.मखरे यांनी मानले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष