नागवडे कारखाना कार्यस्थळावर सोमवारी 21 रोजी धनश्री एंटरप्राइजेस नवीन खत डेपोचे उद्घाटन
*सभासद व ऊस उत्पादकांसाठी ऊस पिक चर्चासत्राचे आयोजन
By : Polticalface Team ,19-08-2023
लिंपणगाव( प्रतिनिधी) सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर कारखाना व बारामती ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने धनश्री एंटरप्राइजेस या नवीन खत डेपोचा उद्घाटन समारंभ आणि ऊस पीक चर्चासत्र सोमवार दिनांक 21 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी १० वाजता नागवडे कारखान्याचे चेअरमन राजेंद्र दादा नागवडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि बारामती ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट चे चेअरमन राजेंद्र दादा पवार यांच्या शुभहस्ते आयोजित करण्यात आला असल्याची माहिती श्री. दीपक सपकाळ यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना सपकाळ यांनी सांगितले की, सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर धनश्री एंटरप्राइजेस या फर्मच्या माध्यमातून वसुमित्र तसेच होमिओपॅथिक औषधे त्याचप्रमाणे सर्व प्रकारचे रासायनिक व सेंद्रिय खते कारखाना कार्यक्षेत्रातील सभासद शेतकऱ्यांना माफक दरात उपलब्ध करून दिली जाणार आहेत. सदर दुकानचा उद्घाटन समारंभ सोमवार दिनांक 21 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी दहा वाजता नागवडे कारखान्याचे चेअरमन राजेंद्र दादा नागवडे यांचे अध्यक्षतेखाली तसेच बारामती ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र दादा पवार यांच्या शुभहस्ते आणि नागवडे कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब भोस, सर्व संचालक मंडळ , कार्यकारी संचालक रमाकांत नाईक साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आयोजित करण्यात आलेले आहे. सदर प्रसंगी ऊस पीक परिसंवादाचे आयोजन करण्यात आलेले असून सदर परिसंवादामध्ये डॉ. हेमांगी जांभेकर, मा. श्री विश्वजीत वाबळे, मा. श्री भूषण पाटील, श्री. भूषण जांभेकर आदी कृषी तज्ञ उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
नागवडे सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रातील सभासद शेतकऱ्यांना अतिशय माफक दरात उच्च दर्जाची खते व बी बियाणे पुरविण्याचा आमचा संकल्प असून या फर्मच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना निश्चितपणे मोठा लाभ होईल याची आम्हाला खात्री आहे. तरी तालुक्यातील सर्व शेतकरी बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन धनश्री एंटरप्राइजेसचे संचालक दीपक सपकाळ यांनी केले आहे.
वाचक क्रमांक :