जिवंत नागाची पूजा करून नागपंचमी साजरी करणारे व नागांचा सांभाळ करणारे गाव
By : Polticalface Team ,21-08-2023
जेऊर अलीम शेख
करमाळा तालुक्यातील जिवंत नागाची पूजा करून नागपंचमी साजरी करणारे व नागांचा सांभाळ करणारे विज्ञान युगातही अनोखे वैशिष्ट्य जपणारे शेटफळ नागोबाचे हे गाव असंख्य भाविक व पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनले आहे. येथील प्राचीन नागनाथ मंदिर हा स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना असून यादव उत्तर काळातील नागनाथ मंदिरातील प्राचिन बारव व शेटफळनाथाचे शिवमंदिरामुळे मुळ मंदीराची भव्यता वाढली आहे.प्रत्येक सोमवारी व श्रावण व आधीक महिन्यात या ठिकाणी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आसते
. करमाळा तालुक्यातील नगर टेंभुर्णी महामार्ग व पुणे सोलापूर रेल्वे मार्गावरील जेऊर रेल्वे स्टेशन पासून पश्चिम दिशेला पाच किलोमीटरवर अंतरावर असणारे गाव म्हणजे शेटफळ नागोबाचे. या गावात दिसणाऱ्या नागांना मारले जात नसल्याने व या गावचे ग्रामदैवतच नागनाथ असल्याने या गावाला नागोबाचे शेटफळ म्हणून ओळखले जाते. या गावात अस्सल कोब्रा जातीचे असंख्य नाग आढळतात गावातील अडचणीच्या मोकळ्या जागेत जुन्या पडक्या घरात नागांचे वास्तव्य आढळते.
येथील लोकांच्या घरात अंथुरनात लहान मुलांच्या पाळण्यात नाग निघाल्याची असंख्य उदाहरणे आहेत घरात आलेल्या नागाला लहान काठीवर घेऊन गावाबाहेरील मंदीराच्या बाजुच्या नैसर्गिक आधीवासात सोडले जाते.त्यांना गावात अभय आसल्याने सर्वत्र मुक्तपणे संचार करत असतात.काठीवर घेण्याचा प्रयत्न केल्यास ते सहज काठीवर बसतात असे अनोखे वैशिष्ट्य असणाऱ्या या गावात श्रावणी पंचमी दिवशी म्हणजेच नागपंचमी दिवशी मोठा उत्सव साजरा केला जातो या दिवशी निघालेल्या नागाला गावातील महिला मंदिरात येऊन पटांगणात ठेवून त्याची पुजा करतात त्यांच्याभोवती गोलाकार उभा राहून नागपंचमीची गाणी म्हणतात. श्रावण महिन्यातील पहील्या दिवसांपासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले होते.यामध्ये भजन कीर्तन आदि धार्मिक कार्यक्रम असतात याची सांगता श्रावण महिन्यातील अष्टमी दिवशी या गावचा भंडारा उत्सवाने होते. या दिवशी देवाच्या पालखीची गावातून मिरवणूक काढली जाते त्याच्यासमोर वारकरी टाळ मृदंगाच्या गजरात हरिनामाचा जयघोष करतात यावेळी भजन भारुडाचे कार्यक्रम केले जातात महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवसी या देवाची यात्रा असते या दिवशी छबीना मिरवणूक काढली जाते. अशी वेगवेगळी वैशिष्ट्य असणारे देवस्थानाला विविध ठिकाणावरून भाविक व पर्यटक आवर्जून भेट देतात.
वाचक क्रमांक :