करमाळा तालुक्यातील हिवरेगावातील अतिप्राचीन श्री नागनाथाचे मंदिर

By : Polticalface Team ,21-08-2023

करमाळा तालुक्यातील हिवरेगावातील अतिप्राचीन श्री नागनाथाचे मंदिर 
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहराच्या पूर्वेला 20 km अंतरावर हिवरे नागोबाचे हे गाव वसलेलं आहे गावाची ओळखच नागोबाचे हिवरे म्हणून करून दिले जाते सिना नदीच्या तीरावर हिवरे गावी श्री नागनाथ ऐतिहासिक मंदिर आहे. दक्षिणात्य बांधकामाचा अप्रतिम नमुना म्हणजे या मंदिराचे कोरीव नक्षीदार बांधकाम होय मुख्य मंदिराचा चौथारा पूर्ण काळ्या पाषाणांमध्ये आहे दहा माणसांनाही हलणार नाही अशा शिळांचा वापर यासाठी केलेला आहे या मंदिराच्या समोरील बाजूस 4 दगडी स्तंभावर आधारलेले घुमट असलेला कोरीव मंडप आहे . त्यामध्ये नंदीची मोठी दगडी मूर्ती आहे यासह मुख्य मंदिराच्या चहूबाजूंनी इतर देव देवतांच्या दगडी कोरीव मुर्ता व मंदिरे आहेत मुख्य मंदिराचे बांधकाम अतिशय कोरीव असून मंदिराचा सभा मंडप पूर्णतः दगडी आहे त्यांच्या खांबावर सुंदर नक्षीकाम केलेले आहे .मंदिराची एकूण उंची साधारणता 50 फूट असून वरील मुख्य कळस सात फुटाचा आहे संपूर्ण मंदिरावर वेगवेगळी चित्रे कोरलेली आहेत. त्यामध्ये हत्ती घोडे सिंह यासह विविध देव देवता व इतर शुभ चिन्हाचा समावेश आहे मंदिराच्या दर्शनी भागावर मंदिराच्याच उंचीची नागमूर्ती कोरलेली आहे पूर्वी बंदिस्त मंदिर आवाराला तीन मुख्य भव्य दिव्य दगडी कमानी प्रवेशद्वारे होती. पण आज त्यातील एक उजव्या बाजूचे प्रवेशद्वार अस्तित्वात आहे .या प्रवेशद्वारासमोर असणारी भव्य दगडी बारव विहीर उकरून टाकल्याने खूप पुरातून ऐतिहासिक ठेवा नष्ट झाला आहे. त्या बारवेचे मोठे मोठे भाषण व इतर राडारोडा आणि वाढलेल्या काटेरी झाडांमुळे या प्रवेशद्वारातून ये जा करता येत नाही मंदिराची संरक्षण भिंत व ओव-या मात्र अस्तित्वात नाहीत. मंदिरा परिसराची पडझड होऊन सौंदर्य कमी झाले आहे पण भाविकांच्या मनातील श्रद्धा ओढ कमी झाली असे मुळीच नाही .मंदिराच्या आवाराबाहेरही इतर दोन छोटी मंदिरे दोन देवतांचे दगडी चौथरे व एक दगडी बांधकाम असलेली बारव आहे गेल्या दहा वर्षापासून मंदिर जीर्णोद्वाराचे काम चालू आहे मुख्य मंदिरातील प्राचीन शिळांवर आता स्टाईल फरशी बसवलेली आहे शिखर व आवरातील मंदिराचे बऱ्यापैकी नूतनीकरण झाले आहे या कामी ग्रामस्थ व भाविक सढळ हाताने देणगी देतात श्रावण महिन्यातील सर्व सोमवारी येथे यात्रा भरते पण तिसऱ्या सोमवारी मुख्य व मोठी यात्रा असते फक्त तालुका जिल्ह्यातीलच नव्हे तर परराज्यातूनही काही भाविक येत असतात सकाळी 11 वाजता पालखी निघते पालखी समोर भाविक लहान थोर टाळ मृदंगाच्या तालावर देहभान विसरून ताल धरतात पंचक्रोशीतील सर्व जाती धर्माचे लोक या यात्रेस उत्साहाने सहभागी होतात गर्दीने मंदिर फुलून जाते
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष