आधुनिक तंत्रज्ञानाबरोबर सेंद्रिय खतांचा वापर करून भरघोस उत्पन्न मिळवा राजेंद्र पवार
नागवडे कारखाना कार्यस्थळावर ऊस पिक चर्चासत्र उत्साहात संपन्न
By : Polticalface Team ,21-08-2023
लिंपणगाव (प्रतिनिधी)- ऊस शेती बरोबरच इतर पिके घेत असतानाच प्रत्येक शेतकऱ्याने आता भविष्य काळात शेती सुधारण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञाना बरोबर सेंद्रिय खतांचा जास्तीत जास्त वापर करूनच शेती सुधारावी असा मौलिक सल्ला ज्येष्ठ शेतीतज्ञ राजेंद्र पवार यांनी ऊस शेती परिसंवाद कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.
सहकार महर्षी नागवडे कारखाना कार्यस्थळावर नागवडे कारखाना यांच्या संयुक्त विद्यमाने धनश्री एंटरप्राइजेस खत डेपोचा उद्घाटन समारंभ व ऊस पिक चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे हे होते.
यावेळी प्रमुख उपस्थितांमध्ये नागवडे कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब भोस, डॉ. हेमांगी जांभेकर, दीपकराव सपकाळ, भूषण जांभेकर, यांच्यासह कारखान्याचे आजी-माजी संचालक कार्यकारी संचालक रमाकांत नाईक शेतकी अधिकारी एस बी कुताळ, कोजन मॅनेजर डी.एम तावरे, ऊस विकास अधिकारी प्रसाद भोसले, इंजिनिअर मधुकर जगताप यांच्यासह सर्व खाते प्रमुख, सभासद, ऊस उत्पादक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना राजेंद्र पवार पुढे म्हणाले की, श्रीगोंदा तालुका हा 75 टक्के सिंचन क्षेत्रा खाली मोडतो. सिंचनाबाबत तालुक्यात चांगले काम झालेले आहे. परंतु अलीकडे पावसाचे होत असलेले अत्यल्प प्रमाण लक्षात घेता ठिबक सिंचनचा अधिकाधिक वापर करून शेतकऱ्यांनी अधिक उत्पन्न मिळवली पाहिजे. उसाच्या बाबतीमध्ये देखील आधुनिक पद्धतीने ऊस शेती केली पाहिजे, खर्च कमी आणि उत्पन्न जास्त याकडे अभ्यासपूर्ण शेती उद्योग हाताळला पाहिजे. बौद्धिक दृष्ट्या शेती करण्याची गरज असल्याचे श्री पवार यांनी यावेळी सांगितले.
वसुमित्र कृषी सल्लागार डॉ. हेमांगी जांभेकर यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, रासायनिक खत व क्षारयुक्त पाणी यामुळे जमिनीचा ऑर्गानिक कार्बन कमी झालेला असल्याने साधारणता तो दोन ते पाच टक्के पर्यंत पाहिजे, यासाठी रासायनिक शेती ऐवजी सेंद्रिय खतांचा वापर अधिक केला पाहिजे. प्रेस मेड पासून प्रोम तयार करून त्याचा वापर उसा सारख्या पिकाला फॉस्फेटची कमतरता भरून येऊ शकते. यासह विविध पिकांना कोणते व किती खते वापरावीत याविषयी सविस्तर असे मार्गदर्शन केले.
कृषी सल्लागार विश्वजीत वाबळे यावेळी म्हणाले की शेतकऱ्यांनी प्रथमतः माती परीक्षणानंतर पिकाला खत टाका. पाणी द्या कमी खर्चामध्ये अधिकाधिक उत्पन्न मिळवण्यास संदर्भात मौलिक असे मार्गदर्शन केले.
यावेळी नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, श्रीगोंदा तालुक्यातील शेती उद्योगातून शेतकऱ्यांना भरघोस उत्पन्न मिळवण्यासाठी सहकार महर्षी दिवंगत शिवाजीराव नागवडे बापू यांनी कारखाना स्थापनेपासून वेळोवेळी शेतकऱ्यांना ऊस परिसंवाद घेऊन मार्गदर्शन केले. परंतु शेतकरी स्वतः शेतीबाबत निर्णय घेताना दिसत नाहीत. शेतकरी सध्या जुन्या पद्धतीने शेती करतात. शेतीतज्ञ दीपक सपकाळ हे बारामती परिसरात अनेक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत. तिथे जाऊन आपण माहिती उपलब्ध करून घेतली पाहिजे. असे सांगून श्री नागवडे आणखी पुढे म्हणाले की रासायनिक खते आणि पिकांवरील विविध प्रकारच्या फवारण्या त्यामुळे त्याचा मानवी आरोग्यावर देखील मोठा विपरीत परिणाम होत असून, आयुष्यमान देखील घटले जात आहे. अत्यंत कमी वयामध्ये देखील हृदयविकाराचे प्रमाण वाढताना दिसत आहेत. ही गंभीर बाब समोर येताना दिसत आहे. भविष्यकाळात आता सर्वांनाच सतर्क होऊन उत्तम प्रकारे शेती करण्याची आवश्यकता आहे. असे सांगून ते आणखी पुढे म्हणाले की, रासायनिक खतापेक्षा सेंद्रिय पद्धतीने शेती करावी माती परीक्षण करून विविध पिके घ्यावीत. निश्चितपणे उत्पन्नात वाढ होईल. दिवसेंदिवस होणारे पावसाचे अत्यल्प प्रमाण त्यामुळे ठिबक सिंचन सारखा वापर करून आधुनिक पद्धतीने शेती करावी, असे आवाहन श्री नागवडे यांनी यावेळी केले.
सूत्रसंचालन भाऊसाहेब बांदल यांनी केले तर कारखान्याचे संचालक राकेश पाचपुते यांनी आभार मानले.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.