छत्रपती शिवाजी महाविद्यालयात मुलांना लाभले कंपनी सेक्रटरी (CS) चे मार्गदर्शन
By : Polticalface Team ,22-08-2023
लिंपणगाव (प्रतिनिधी) श्रीगोंदा येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात वाणिज्य विभागात शिकत असलेल्या मुलांना कंपनी सेक्रेटरी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.विद्यार्थ्यांनाअध्ययनाशी संबंधित असलेले ज्ञान तर महाविद्यालयात मिळतच असते .परंतु त्यांच्या करिअरच्या दृष्टिकोनातून आवश्यक असलेले ज्ञान मिळावे ,या हेतूने आहे ,वाणिज्य विभागामार्फत "Career Awareness Programme on Career as a Company Secretary" या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सतीशचंद्र सूर्यवंशी सर यांनी भूषविले.कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडीया चे चेअरमन सी.एस विशाल पाटील व सी. एस विशाल साळुंखे होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी वाणिज्य विभाग प्रमुख आदरणीय प्रा. साबळे सर व माजी विद्यार्थी सी. एस. विशाल चोरडिया उपस्थित होते.सी एस विशाल पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना सीएस म्हणजे काय आणि त्याबाबत आवश्यक पात्रता व इतर बाबींचे मार्गदर्शन केले. तर सी.एस विशाल साळुंखे सर यांनी आपल्या मनोगत आतून विद्यार्थी हा ग्रामीण भागातून आलेला असो अथवा शहरी भागातून आलेला असो विद्यार्थ्यांसमोर विशिष्ट ध्येय साध्य करण्यासाठी जिद्द, चिकाटी, आणि निष्ठा ठेवली तर ते सहज एखादी गोष्ट मिळू शकतात असे मत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाणिज्य विभाग प्रमुख डॉ.परदेशी पी.बी यांनी केले.प्रा.शिंदे आर.जी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर डॉ.भोस एम. एस यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.
वाचक क्रमांक :