घोडचे आवर्तन आठ दिवसात न सोडल्यास सिंचन भरणासमोर धरणे आंदोलनकरू- राजेंद्र नागवडे
By : Polticalface Team ,23-08-2023
लिंपणगाव( प्रतिनिधी) घोडचे आवर्तन आठ दिवसात 31 ऑगस्ट पर्यंत न सोडल्यास पुणे येथील सिंचन भावना समोर शेतकऱ्यां समवेत धरणे आंदोलन केले जाईल असा इशारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी श्रीगोंदा येथील आयोजित धरणे आंदोलन प्रसंगी दिला आहे.
श्रीगोंदा येथील तहसील कार्यालयासमोर काँग्रेस पक्षाच्या वतीने केंद्र शासनाने कांदा निर्यातीवर 40 टक्के निर्यात कर त्वरित रद्द करावा व घोड धरणातून तातडीने आवर्तन सोडावे या प्रश्नांकरता काँग्रेस पक्षाच्या वतीने तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे हे होते.
या धरणे आंदोलनात श्रीगोंद्याचे नगराध्यक्षा शुभांगी पोटे, नागवडे जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष स्मितल वाबळे, कारखान्याचे संचालक सुभाषराव शिंदे, रामचंद्र नागवडे, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रा धर्मनाथ काकडे, अॅड रंगनाथ बिबे, अनिल ठवाळ, प्रमोद शिंदे, चांगदेव पाचपुते यांच्यासह नागवडे कारखान्याचे आजी-माजी संचालक, श्रीगोंदा मार्केट कमिटीचे संचालक, पंचायत समितीचे सदस्य, खरेदी विक्री संघाचे सदस्य, विविध कार्यकारी सेवा संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आंदोलकांसमोर बोलताना श्री नागवडे पुढे म्हणाले की, केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर लावलेला आघोरी स्वरूपाचा 40 टक्के निर्यात कर त्वरित रद्द करून कांदा निर्यातीस परवानगी द्यावी शेतकरी कांदा उत्पन्न घेत असताना सततचा पाऊस असतानाही शेतकऱ्यांनी कांद्याला चांगला भाव मिळेल ही अपेक्षा ठेवली. कष्टातून कांदा पिक घेतले. परंतु केंद्र व राज्य सरकार मात्र शेतकरी विरोधी धोरण राबवत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था आहे. केंद्र व राज्य सरकार वारंवार शेतकऱ्यांच्या प्रश्नसंदर्भात घोषणा देतात. परंतु त्याची अंमलबजावणी केली जात नाही. केंद्र व राज्य सरकार शेतकरी विरुद्ध धोरण राबवत आहे. ईडी सारख्या नोटीसा देऊन कष्टकरी शेतकऱ्यांचा आवाज दाबला जात आहे. हे सरकारचे धोरण शेतकरी व सर्वसामान्य जनता कदापिही सहन करणार नाही. असे सांगून श्री नागवडे पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांना कष्ट करून पिकविलेला माल कवडीमोल किमतीने विकावा लागतो. भाव वाढला तर लगेच त्याच्यावर 40% निर्यात कर लावला जातो. त्यामुळे संपूर्ण देश व राज्यातील शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झालेली आहे. घोड कालव्याचे हक्काचे पाणी आठ दिवसात न सोडल्यास सिंचन भावना समोर शेतकऱ्यांना बरोबर घेऊन पुन्हा तीव्र धरणे आंदोलन करण्याचा इशारा श्री नागवडे यांनी यावेळी दिला.
याप्रसंगी श्रीगोंद्याचे नायब तहसीलदार निलेश वाघमारे व पी आय ज्ञानेश्वर भोसले यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले.
यावेळी ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस यावेळी बोलताना म्हणाले की, दोन लाख टन कांदा नाफेड मार्फत २४०० रुपयांनी खरेदी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय अत्यंत दुर्दैवी असून शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा हा निर्णय अत्यंत निंदनीय असल्याचे श्री भोस यावेळी सांगितले.
युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे यावेळी म्हणाले की शेतकऱ्यांनी आंदोलने किती दिवस करायचे. केंद्र व राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे शेतकऱ्यांना आंदोलन करण्याची वारंवार वेळ येऊन ठेपले आहे. घोड धरणामध्ये एका रोटेशन चे पाणी आहे, परंतु ते सोडले जात नाही. पावसाने पाठ फिरवली. महागाईचा संपूर्ण देशात भस्मासुर झाला असून, शेतकऱ्यांमध्ये केंद्र व राज्य सरकार विषयी नाकारती भावना निर्माण झाल्याचे श्री वाबळे यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी मुकुंद सोनटक्के, शिवाजीराव पाचपुते, नागवडे कारखान्याचे संचालक प्रशांत दरेकर, भाऊसाहेब बरकडे, प्रा धर्मनाथ काकडे आदींसह अनेक शेतकरी व कार्यकर्त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढत तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. प्रस्ताविक नागवडे कारखान्याचे संचालक प्रशांत दरेकर यांनी केले. सूत्रसंचालन धर्मनाथ काकडे यांनी केले. तर आभार युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे यांनी मानले.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.