नवभारत साक्षरता अभियान सर्वेक्षण कामावर राज्य प्राथमिक शिक्षक संघाचा बहिष्कार-
राज्य सरचिटणीस आबासाहेब जगताप
By : Polticalface Team ,24-08-2023
लिंपणगाव (प्रतिनिधी)- नवभारत साक्षरता अभियान संरक्षण कामावर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने बहिष्कार घातला आहे. अशी माहिती राज्य अध्यक्ष अंबादास वाजे व राज्य सरचिटणीस आबासाहेब जगताप यांनी एका निवेदनाद्वारे शालेय शिक्षण मंत्री व प्रधान सचिवांना दिली आहे.
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर व शालेय शिक्षण प्रधान सचिव रणजीत सिंग देओल यांना दिलेल्या निवेदनात श्री वाजे व आबासाहेब जगताप यांनी म्हटले आहे की, प्राथमिक शिक्षक मुख्याध्यापक केंद्रप्रमुख यांच्या माध्यमातून संपूर्ण राज्यात नवभारत साक्षरता अभियानांतर्गत वय वर्षे 15 ते पुढील सर्व वयोगटातील निरीक्षरांचे ऑफलाइन सर्वेक्षण करण्याचे आदेश पारित केले आहे.
निरीक्षराचे सर्वेक्षण हे शैक्षणिक काम असून, ते काम करून घेण्याची शासनाचे धोरण दिसते. पुढे या निवेदनात आणखी म्हटले आहे की, या कामामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शिक्षकांना फक्त शिकवण्याचे काम करू द्यावे. म्हणून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने 20 ऑगस्ट 2023 रोजी झालेल्या राज्य पदाधिकारी यांच्या झालेल्या बैठकीच्या निर्णयानुसार संघटनेच्या वतीने नवभारत साक्षरता सर्वेक्षण या कामावर संपूर्णपणे बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला असून, महाराष्ट्र राज्यातील प्राथमिक शिक्षक संघाचे सभासद या सर्वेक्षणाचे काम करणार नाही. यावेळी घोषित करण्यात आले आहे.
या निवेदनात आणखी पुढे म्हटले आहे की, सर्वेक्षणाच्या कामाबरोबरच इतरही शैक्षणिक कामे तसेच वेगवेगळ्या प्रकारचे तयार अॅप करण्यात आले असून, त्या ॲपवर एकाच वेळी अनेक प्रकारच्या माहिती मागविल्या जातात ही सर्व प बंद करून शिक्षकांना फक्त गुणवत्ता वाढीचे व शिकविण्याचे काम करू द्यावे. अशा प्रकारचे निवेदन शालेय शिक्षण मंत्री व राज्याचे शालेय प्रधान सचिवांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले असल्याची माहिती राज्य सरचिटणीस आबासाहेब जगताप यांनी सांगितले.
वाचक क्रमांक :