करमाळा तालुक्यातील मांगी शिवारात अद्यापही बिबट्याची दहशत कायम, शेतकरी वर्ग कमालीचा घाबरला, पिंजऱ्याची संख्या वाढवण्याची होत आहे ग्रामस्थांमधून मागणी

By : Polticalface Team ,24-08-2023

करमाळा तालुक्यातील मांगी शिवारात अद्यापही बिबट्याची दहशत कायम, शेतकरी वर्ग कमालीचा घाबरला, पिंजऱ्याची संख्या वाढवण्याची होत आहे ग्रामस्थांमधून मागणी जेऊर प्रतिनिधी करमाळा अहमदनगर या राष्ट्रीय महामार्गावरील मांगी तसेच कामुने वडगाव या परिसरात बिबट्याची अद्यापही दहशत कायम असून मांगी परिसरातील शेतकरी सध्या कमालीच्या दहशतीखाली वावरत आहे 23 ऑगस्ट बुधवारी च्या मध्यरात्री दोन वाजता बिबट्याने मांगी येथील विनोद आदिनाथ बागल यांच्या गोठ्यात बांधलेल्या गाईच्या वासरा वरती हल्ला करून वासराला ठार केले आहे. हा बिबट्या दररोज शेतकऱ्यांच्या गाई वासरांवरती हल्ले करून जनावरे ठार करत आहे .
गेल्या चार ऑगस्ट पासून आज 24 ऑगस्ट उजाडला, तरी तब्बल वीस दिवस हा बिबट्या वन विभागाला चकवा देत असून.. हा बिबट्या दररोज पाळीव प्राण्यांवरती हल्ले करून त्यांना फस्त करत आहे. गेल्या वीस दिवसात किमान दहा ते पंधरा शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांवरती हल्ले करून ठार केलेले आहे.
यामुळे मांगी पंचक्रोशीतील दक्षिण वडगाव, उत्तर वडगाव, पोथरे ,कामोने जातेगाव या शिवारामध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण असून, शेतकरी जीव मुठीत धरून शेतीची कामे करत आहेत. तसेच शेतात काम करण्यासाठी महिला मजूर घाबरत असून, रात्री बाहेर पडायला सुद्धा लोक घाबरत आहेत. यामुळे समस्त गावकऱ्यांकडून वनविभाग कर्मचाऱ्यां वरती संताप व्यक्त केला जात आहे.
वारंवार पिंजरे लावूनही बिबट्या वनविभागाच्या हाती लागत नसून, तो दररोज आपली जागा बदलत असून वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन पाळीव जनावरांवरती हल्ले करत आहे. तरी सदरील बिबट्याला लवकरात-लवकर जेर बंद करा ही ग्रामस्थांकडून वारंवार मागणी होत आहे.
गेली एक महिन्यापासून आम्ही ग्रामस्थ बिबट्याच्या प्रचंड दहशतीमुळे रात्री शेताकडे फिरकत नाही आमची उभी पिके अक्षरशः जळत आहे बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकरी कमालीचा घाबरला आहे तेव्हा शासनाने ड्रोन च्या माध्यमातून बिबट्याचा तपास करावा अन्यथा पिंजऱ्याची संख्या वाढवावी.
नवनाथ बागल- सरपंच मांगी तालुका करमाळा
मांगी,पूनवर,पोथरे, कामोणे परिसरात गेली महिनाभरापासून बिबट्याचा वावर असल्याने या भागातील शेतकरी, नागरिकांना रात्री-अपरात्री शेती कामासाठी बाहेर पडावे लागते.त्यामुळे या भागात बिबट्याची प्रचंड भीती आहे. त्यामुळे महावितरण विभागाने याबाबतची तत्परता दाखवत या भागाला दिवसा विज सोडावी. तसेच वनविभागाने त्या भागात आजून पिंजरे व कॅमेरे वाढवून बिबट्यास तात्काळ जेरबंद करावे.त्या बिबट्याने वासरू, कुत्र्याला फस्त करून खाल्ले आसून देखील वनविभागाने तत्पता दाखवलेली नाही. एखाद्या माणसांचा बळी जाण्याची वाट वनविभाग पहाता आहे.काय? तसेच झाले तर त्या संबंधित अधिकाऱ्यांला राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने काळे फासू. अंगद देवकते जिल्हा सरचिटणीस रासप..

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.