बिबट्याची पिल्लांची अफवा मात्र ते निघाले उदमांजर शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

By : Polticalface Team ,25-08-2023

बिबट्याची पिल्लांची अफवा मात्र ते निघाले उदमांजर शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

     लिंपणगाव( प्रतिनिधी) श्रीगोंदा तालुक्यातील लिंपणगाव शिवारातील शेंडेवाडी येथील कणसे वस्तीवर उसाच्या शेतात बिबट्याची पिल्ले दिसली पिल्ले दिसून शेतकरी घाबरले मात्र ते निघाले उदमांजर. ही घटना शुक्रवारी 25 रोजी दुपारी १२ वाजता घडली. या शेंडेवाडीतील संबंधित शेतकरी उसाच्या शेतीला पाणी देत असताना अचानक त्यांना बिबट्याच्या मादीची पिल्ले निदर्शनास आली. ते पाहिल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाल्याने त्यांनी येथील दीपक शेळके या युवक कार्यकर्त्याला कल्पना देताच श्री शेळके यांनी स्थानिक पत्रकार नंदकुमार कुरुमकर यांना बिबट्या संबंधित माहिती कळविली. पत्रकार कुरुमकर यांनी तात्काळ तालुक्याचे वनअधिकारी श्रीमती खराडे मॅडम यांच्याशी संपर्क करून घडल्या घटनेची माहिती देतात वनाधिकाऱ्यांनी वनरक्षक नितीन डफडे यांना घटनास्थळीची माहिती घेण्याचे सांगितले. वनरक्षक श्री डफडे यांनी संबंधित शेतकऱ्याच्या व्हाट्सअपवर त्या पिल्लांचे फोटो काढून बिबट्याचे पिल्लू संदर्भात खात्री करून घेतली. परंतु ते निघाले उद मांजराची तीन पिल्ले. खात्री पटल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण कमी झाले. दरम्यान मुंढेकरवाडी, शेंडेवाडी, गणेशा, आनंदवाडी, लोणी व्यंकनाथ या परिसरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून बिबट्याचा वावर वारंवार दिसतो. शेतकरी व शेतमजूर मात्नर आपला जीव मोठे धरून शेतामध्ये काम करत आहेत बिबट्या केव्हा येणारे हल्ला करेल हे भीतीचे वातावरण या गावांमध्ये कायमच दिसून येते. शेंडेवाडी येथील संबंधित शेतकऱ्याला बिबट्याच्या आकाराची तीन पिल्ले दिसल्याने मनामध्ये रुक रुक वाढली. त्यांचे शेतामध्ये काम करण्याचे धाडस झाले नाही. यापूर्वी या परिसरांमध्ये बिबट्याने अनेक वेळा धुमाकूळ घालून पाळीव जनावर हल्ले करण्याचे प्रकार नेहमीच पहावयास मिळत आहेत. त्यामध्ये वनकर्मचाऱ्यांची संख्या तुटुपुंजी असल्याने त्यांना घटनास्थळी जाण्यासाठी विलंब लागतो. हे प्रकार थांबवण्यासाठी राज्य सरकारने वन कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याचे अपेक्षा आहे. सद्यस्थितीला भीमा नदी काठावरील गावांमध्ये जास्त करून बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात दिसत आहे. तेथे ऊस शेती मोठ्या प्रमाणावर असून, नदीकाठावर झाडांचे जंगल असल्याने त्यांना तिथे दडण व आश्रय मिळतो अशा परिस्थितीत ते सायंकाळी गाव परिसरातील वस्त्यांमध्ये बेधडक जनावरांवर हल्ले करून बळी घेत आहेत. विशेष म्हणजे श्रीगोंदा तालुक्यात वन अधिकारी व वन कर्मचारी संख्या कमी असतानाही घटनेची माहिती कळताच तेथे जाऊन माहिती घेतात. व बिबट्या संदर्भात घ्यावयाची काळजी व उपाय यासंबंधी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात. आपले उत्तम प्रकारे कर्तव्य बजावतात. हे प्रकार रोखण्यासाठी वन कर्मचाऱ्यांना तालुक्याच्या ठिकाणी बिबट्यांना झेरबंद करण्यासाठी कर्मचारी संख्या वाढवून पिंजरे देखील मोठ्या प्रमाणात उपलब्ध करण्याची आवश्यकता असल्याचे शेतकऱ्यांमधून बोलले जात आहे. मात्र उद मांजराच्या पिल्लाने बिबट्या समजून शेतकऱ्यांची भीती अधिक वाढण्याचे शेतकरी सांगतात.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष