वडगाव निंबाळकर-अमोल गायकवाड
मोरगाव बाजूकडून नीरा बाजूकडे जाणारा मालवाहतूक ट्रक शुक्रवारी पहाटे मुर्टी चिरेखानवाडी दरम्यान उलटला. सुदैवाने यामध्ये ट्रक चालक व क्लिनर किरकोळ जखमी झाले.
जनरेटरचे अवजड भाग घेवून मालवाहतूक ट्रक ( एम एच २० इ एल ५६८९ ) कोल्हापूरला निघाला होता. शुक्रवारी पहाटे मुर्टी चिरेखानवाडी चालकाचा ताबा सुटल्याने उलटला. घटनेची माहिती मिळताच वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काळे, उपनिरीक्षक योगेश शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक घटनास्थळी हजर झाले. सहाय्यक फौजदार दीपक वारुळे, पोलीस नाईक सागर देशमाने, पोलीस कॉन्स्टेबल महादेव साळुंखे, संतोष जावीर व पोलीसमित्र ओंकार काळभोर, महेश खोमणे यांनी ट्रक चालक व क्लिनर यांना वैद्यकीय मदत केली व वाहतूक सुरळीत केली. काही वेळाने पोलीस कर्मचाऱ्यांनी क्रेनच्या सहाय्याने अपघात ग्रस्त ट्रक सुरक्षित ठिकाणी नेला
वाचक क्रमांक :