By : Polticalface Team ,25-08-2023
लिंपणगाव (प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्यातील धार्मिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या लिंपणगाव येथे सालाबाद प्रमाणे चालू वर्षी श्रावण महिन्यात भव्य असे अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वर पारायण सोहळा आयोजित केला आहे. त्या पार्श्वभूमीवर चालू वर्षी देखील गावातील सप्ताह मंडळ व ग्रामस्थांनी सुयोग्य असे नियोजन करून अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा कायम राखली आहे. तालुक्यातील नामवंत प्रवचने व कीर्तने सायंकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत भक्तिमय व आनंदी वातावरणामध्ये आयोजित केली जातात. मंगळवारी 22 ऑगस्ट रोजी दत्तात्रय महाराज ढोरजकर, तसेच 23 रोजी संजय महाराज घोडके, 24 रोजी स्वप्निल महाराज खोरे यांची कीर्तने पार पडली. शुक्रवारी 25 ऑगस्ट रोजी संजय महाराज गिरमकर यांचे कीर्तन पार पडले. शनिवारी डॉ गजानन वावळ पुणे यांचे कीर्तन आयोजित केले आहे. रविवारी 27 रोजी ह भ प माऊली महाराज मस्के यांचे कीर्तन होणार आहे. 28 रोजी कविराज महाराज झावरे पारनेर यांचे सायंकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत कीर्तन सोहळा आयोजित करण्यात आला असून, त्याच दिवशी सायंकाळी चार वाजता गावात दिंडी प्रदक्षिणा सोहळा डोळ्याचे पारणे फेडावे अशाप्रकारे आयोजित करण्यात आलेला आहे. मंगळवारी 29 ऑगस्ट रोजी केशव महाराज उखळीकर परळी वैजनाथ यांचे सकाळी नऊ ते अकरा काल्याचे किर्तन आयोजित करण्यात आलेले आहे.
दरम्यान लिंपणगाव मध्ये जवळपास 25 ते 30 वर्षापासून सिद्धेश्वर महाराजांच्या प्रांगणात अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा कायम आहे. याप्रसंगी गावातील सर्व ग्रामस्थ एकत्र येत हा सोहळा भक्तिमय व आनंदी वातावरणामध्ये साजरी करतात. चालू वर्षी ग्रामस्थ सप्ताह मंडळाने किर्तन सोहळा सायंकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत पार पडल्यानंतर पंचक्रोशीतील सर्व उपस्थित भावी भक्तांना दररोज महाप्रसादाचे आयोजन करण्यात येत आहे. या श्रावणी सुखाचा पंचक्रोशीसह तालुक्यातील अनेक भावी भक्त लाभ घेताना दिसत आहेत. त्यामुळे लिंपणगाव मध्ये आठ दिवस पंढरीचे स्वरूप येताना दिसत आहेत. या अखंड हरिनाम सप्ताह निमित्त पंचक्रोशी सह तालुक्यातील अनेक दानशूर भक्तांनी सढळ हाताने देणगी देऊन आपला सहभाग नोंदवून सदरचा सोहळा अगदी मोठ्या दिमाखामध्ये साजरा करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या सोहळ्याप्रसंगी कुठलाही राजकीय व पक्षीय वातावरण विरहित या सोहळ्यास सहभाग घेऊन प्रसन्न वातावरणात या सप्ताहाची सांगता होण्यासाठी ग्रामस्थ सप्ताह मंडळ परिश्रम घेत आहेत.
वाचक क्रमांक :