बाळासाहेब भोर यांची काँग्रेसच्या तालुका शिक्षक सेलचे अध्यक्षपदी निवड
By : Polticalface Team ,26-08-2023
लिंपणगाव( प्रतिनिधी)-- शिक्षण क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्व श्री बाळासाहेब नामदेव भोर यांची श्रीगोंदा तालुका राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या तालुका शिक्षक सेल अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. निवडीचे पत्र तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रा. डॉ. धर्मनाथ काकडे यांनी एका पत्राद्वारे दिले. दोन दिवसापूर्वी श्रीगोंदा तालुक्यातील चिखली येथे एका आयोजित कार्यक्रमात माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते श्री भोर यांना निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे श्रीगोंदा तालुका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा धर्मनाथ काकडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रामदास झेंडेहे यावेळी उपस्थित होते. या निवडीच्या पत्रात म्हटले आहे की, देशाचे नेते खासदार राहुल गांधी व राज्याचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली आपण काँग्रेस प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने व अहमदनगर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांच्या नेतृत्वाखाली तालुका काँग्रेस कार्यकारणीद्वारे संघटन वाढवावे, काँग्रेस पक्षाचा विचार व समाजातील शेतकरी, शेतमजूर, कामगार, दिनदलित वर्गाच्या कल्याणसाठी प्रयत्नशील राहावे.
पुढे या निवेदनात आणखी म्हटले आहे की, काँग्रेस पक्षाला महात्मा गांधी, देशाचे माजी पंतप्रधान पंडित नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, मौलाना आझाद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची व त्यागाची परंपरा आहे. तालुक्याचे दिवंगत नेते स्वर्गीय सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे बापू यांच्या विकासाच्या समानतेच्या विचाराने आपण आपली पक्ष बांधणी व विचारधारा समाजाच्या तळागाळापर्यंत आपण पोहोचवाल याची आम्हाला खात्री आहे. असे भोर यांना दिलेल्या नियुक्ती पत्रात तालुका अध्यक्ष श्री काकडे यांनी नमूद केले आहे. या निवडीचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे, जिल्हा बँकेच्या संचालिका अनुराधाताई नागवडे व शिक्षण क्षेत्रासह विविध शिक्षक संघटना पदाधिकारी तसेच सहकार क्षेत्रातील मान्यवरांकडून श्री बाळासाहेब भोर यांचे अभिनंदन केले आहे. तालुक्यातील काँग्रेसच्या बळकटीसाठी कार्यकर्त्यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी