बागल गटाला दणका श्री मकाई सहकारी साखर कारखान्यावर आरसीसी प्रमाणे कारवाई करण्याचे प्रादेशिक सहसंचालक साखर सोलापूर यांचे आदेश- प्राध्यापक रामदास झोळ

By : Polticalface Team ,26-08-2023

बागल गटाला दणका
 श्री मकाई सहकारी साखर कारखान्यावर आरसीसी प्रमाणे कारवाई करण्याचे प्रादेशिक सहसंचालक साखर सोलापूर यांचे आदेश-  प्राध्यापक रामदास झोळ करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60 – तालुक्यातील श्री मकाई सह. साखर कारखान्याने गाळप हंगाम २०२२-२१ ची ऊस पुरवठादारांना देय बाकी असलेली रक्कम वारंवार सूचना देऊनही चुकती न केल्याने आयुक्त साखर महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी आर.आर.सी. प्रमाणे कार्यवाही करण्याचे आदेश निर्गमित केले होते. आता या कार्यवाहीस प्रत्यक्ष सुरुवात झाल्याची माहिती दत्तकला शिक्षण संस्थेचे प्रा. रामदास झोळ यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

याबाबत सविस्तर बोलताना प्रा. झोळ यांनी सांगितले आहे की, या कार्यवाहीनुसार मकाई कारखान्याकडे २०२२-२३ च्या हंगामातील एफआरपी दराप्रमाणे २६ कोटी ३२ लाख १८ हजार आणि त्यावरील व्याज वसूल करण्यासाठी आरआरसी आदेश साखर आयुक्त, पुणे यांच्याकडून निर्गमित करण्यात आले आहेत. परंतु मकाईच्या स्थावर आणि जंगम मालमत्तेचे मूल्य आरआरसी आदेशातील रकमेपेक्षा कमी असल्याने जमीन महसूल अधिनियमाप्रमाणे तत्कालीन संचालक मंडळाच्या स्थावर मालमत्तेवर बोजे नोंद करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. द्वितीय विशेष लेखापरीक्षक वर्ग -१ यांनी दिलेल्या मकाईच्या जंगम व स्थावर मालमत्तेच्या यादीनुसार कारखान्याकडे केवळ २ लाख ७५ हजार रुपयांची साखर शिल्लक आहे.

अशाप्रकारे कारखान्याच्या मालमत्तेपेक्षा देय रक्कम जास्त असल्यामुळे प्रादेशिक सहसंचालक (सोलापुर) पांडुरंग साठे यांनी जिल्हाधिकारी सोलापूर यांना दिलेल्या पत्रात मकाई कारखान्याच्या २०२२-२३ च्या गाळप हंगामातील थकीत एफआरपी रकमेचबाबत आरआरसी प्रमाणे कार्यवाही करण्याबाबत कळवले आहे. या पत्राची प्रत तहसीलदार करमाळा यांनाही पाठवण्यात आली आहे, अशी माहिती प्रा. झोळ यांनी या पत्रकार परिषदेत दिली आहे.
दरम्यान प्रादेशिक सहसंचालक साखर सोलापूर यांच्या आदेशाने सोलापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रामध्ये एकच खळबळ माजली आहे

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी