शेटफळ नागोबाचे येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळा उभारण्या कामी ग्रामस्थांना प्रशासनाने सहकार्य करावे,,,,,,,, शंभूराजे जगताप
By : Polticalface Team ,26-08-2023
करमाळा प्रतिनिधी शेटफळ नागोबाचे येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारणे कामी प्रशासनाने ग्रामस्थांना सहकार्य करावे अशी मागणी जगताप गटाचे युवा नेते तसेच करमाळा तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन शंभूराजे जगताप यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे
जिल्हाधिकारी यांना पाठवलेल्या निवेदनात जगताप यांनी म्हटले आहे की करमाळा तालुक्यातील मौजे शेटफळ नागोबा तालुका करमाळा येथील ग्रामस्थांनी तडे गेलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जुन्या पुतळ्याच्या जागी नवीन अश्वारूढ पुतळा उभारणे कामे आपण प्रशासनामार्फत ग्रामस्थांच्या भावना विचारात घेऊन योग्य अशी जागा उपलब्ध करून द्यावी आबादीत सामाजिक सलोखा असलेल्या शेटफळ नागोबा या गावाला ऐतिहासिक व धार्मिक पार्श्वभूमी असून येथील सर्व जाती धर्माचे लोक एक विचाराने राहतात तेव्हा जनभावनेचा आधार करून आपण याबाबत तात्काळ योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी जगताप यांनी निवेदनाच्या शेवटी केली आहे
निवेदनाच्या प्रती अधिक माहितीस्तव सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक यांना पाठवले आहेत
वाचक क्रमांक :