शेटफळ नागोबाचे येथील छत्रपती शिवाजी महाराजाच्या अश्वारूढ पुतळ्या बाबत प्रशासनाने ठोस भूमिका घ्यावी,,,,,, शेटफळ ग्रामस्थांमधून होत आहे मागणी
By : Polticalface Team ,28-08-2023
करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60
शेटफळ येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासंबंधी अद्यापही प्रशासनाने कोणतीही भूमिका घेतली नाही तेव्हा प्रशासनाने त्वरित आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी शेटफळ ग्रामस्थांमधून होत आहे
शेटफळ येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यामुळे शिवभक्तविरुद्ध प्रशासन असा संघर्ष निर्माण झाला होता. मात्र याची माहिती सर्वत्र पसरताच हजारो शिवभक्त एकत्र आले असून पुतळा हटवल्यास उद्रेक होईल, असा इशारा दिला आहे. सध्या शेटफळ येथे हजारो शिवभक्त जमा झाले आहे माजी आमदार नारायण पाटील, बागल गटाचे नेते दिग्विजय बागल, जगताप गटाचे नेते शंभूराजे जगताप, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांच्यासह अनेक गावातून शिवभक्त येथे दाखल होऊन गावकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत.
शेटफळ येथे २० वर्षांपासून श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा अर्धाकृती पुतळा होता. मात्र गावकऱ्यांनी एकत्र येऊन त्याच ठिकाणी लोकवर्गणीतून अश्वरूढ पुतळा बसवला. मात्र याला परवानगी नसल्याने प्रशासनाने विरोध करत हा पुतळा हटवण्याची मागणी केली होती. याची माहिती शिवभक्तांमध्ये पोहोचल्यानंतर तणाव निर्माण झाला होता. हा पुतळा हटवला तर सर्वत्र उद्रेक होईल, असा इशारा देण्यात आला होता.
दरम्यान परिसरातील केडगाव, चिखलठाण, माढा तालुक्यातील पिंपळनेर, जेऊर, केम, कंदर, कुंभेज, सावडी आदी पर जिल्ह्यातील अनेक शिवभक्तांनी मोटारसायकलवर येऊन शेटफळ येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून शेटफळकरांच्या पाठीशी असल्याचे जाहीर करत पुतळा हटवू नये, अशी भावना व्यक्त केली आहे.
या भागातील नेते बाजार समितीचे संचालक चंद्रकांत सरडे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड, संभाजी ब्रिगेडचे नितीन खटके, पंचायत समितीचे माजी उपसभापती दत्तात्रय सरडे आदींनी येथे भेटी देऊन श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले आहे. शिवजयंती उत्सव समिती करमाळा शहर व तालुका यांनीही ‘आय स्पोर्ट शेटफळकर’ अशी सोशल मीडियावर मोहीम सुरु केली आहे. तेव्हा प्रशासनाने त्वरित आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.