बाहेरील कारखान्या प्रमाणे उच्चांकी गाळप झाल्यास नागवडे कारखाना ही ऊस भावात मागे राहणार नाही अध्यक्ष  राजेंद्र दादा नागवडे
                      
                
            
               By : Polticalface Team ,30-08-2023
       
               
                           
                 लिंपणगाव (प्रतिनिधी)- बाहेरील कारखान्यांप्रमाणे नागवडे कारखान्याचे उच्चांकी गाळप झाल्यास निश्चितपणे पुढील गाळपास ऊस भाव देण्यात मागे राहणार नाही, अशी ग्वाही नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे यांनी सर्वसाधारण सभेत बोलताना दिले.
     सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखान्याची सन 2022 23 या आर्थिक वर्षाची 58 वी सर्वसाधारण सभा कारखाना कार्यस्थळावर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. अहवाल वाचन कारखान्याचे कार्यकारी संचालक रमाकांत नाईक यांनी केले. सभेपुढील १ ते 14 विषय मंजूर करण्यात आले.   
      
         यावेळी अध्यक्ष स्थानावरून बोलताना कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे यावेळी बोलताना म्हणाले की, कारखान्याचे जेवढे ऊस गाळप उच्चांकी होईल त्यानुसार बाहेरील कारखान्यांप्रमाणे नागवडे कारखाना देखील ऊस भाव देईल सहकारी साखर कारखानदारीला सहकाराच्या नियमानुसारच कारभार पहावा लागतो. खाजगी कारखान्यांना बंधने नाहीत त्यामुळे सहकारी साखर कारखान्याची ऊस गळतात जितकी रिकवरी जास्त तेवढा भाव देता येतो. हा सहकाराचा नियम आहे. तरी देखील बाहेरील कारखान्याप्रमाणे उच्चांकी गाळप झाल्यास त्याप्रमाणे ऊस भाव दिला जाईल, असे सांगून नागवडे पुढे म्हणाले की निवडणूक प्राधिकरणाच्या निर्णयानुसार 50 लाख रुपये निवडणूक खर्च पडला. त्यामुळे संशय घेण्याचे कारण नाही. एन सीडी कडे 20 कोटीचे कर्ज सहा टक्के ने मागितले. त्यामध्ये जिल्हा बँकेने 9 ते 12 टक्क्याने कर्ज देण्याची तयारी ठेवली. डिस्टिलरी साठी 98 कोटीचे कर्ज मागणी केली. आपल्या कारखान्याकडे 90 कोटीचे फक्त कर्ज आहे. काहीजण चुकीचे कर्ज दर्शवतात सभासदांमध्ये संभ्रमाचे वातावरण तयार करतात. संस्थेविषयी बाधक वातावरण तयार करतात. अशा सभासदांवर सहकार अधिनियम कायदा 35 नुसार सर्वसाधारण सभेत सभासदत्व रद्द करण्याची तरतूद आहे. तो देखील ठराव मंजुरीसाठी ठेवला आहे. असे सांगून नागवडे पुढे म्हणाले की, साखर कामगारांना शासनाच्या नियमानुसार 8.33% बोनस द्यावा लागतो. तर कार्यकारी संचालकांना देखील शासनाच्या नियमानुसार मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्यात गैर काय? असे सांगून ते आणखी पुढे म्हणाले की, सहकार महर्षी बापूंनी सभासद हित डोळ्यासमोर ठेवले त्यांचीच प्रेरणा डोळ्यासमोर ठेवून नागवडे कारखान्याचा कारभार संचालक मंडळ पाहत आहे. ऊस उत्पादक शेतकरी आधुनिक पद्धतीने व शेती करत नाहीत, त्यामुळे उसाची रिकवरी देखील घसरलेली दिसते. घोडच्या आवर्तना संदर्भात बोलताना नागवडे आणखी पुढे म्हणाले की, शेतकरी वेळेत पाणी वापर संस्थांची पाणीपट्टी भरत नाही. वेळेत पाणी फॉर्म भरत नाही, त्यामुळे आवर्तन सुद्धा लांबले जाते. एकमेव वांगदरी पाणी वापर संस्था शंभर टक्के पाणीपट्टी भरते. अशी स्थिती आहे. तालुक्यात 17 ते 25 लाख मॅट्रिक टन ऊस तयार होत आहे. तालुक्यातील एका कारखान्याने दहा वर्षात ऊस उत्पादकांना 100 कोटी कमी दिले. तिथे मात्र कोणी बोलत नाही. ऊस भावाबाबत नागवडे कारखाना कदापिही मागे राहणार नाही. दोन वर्षामध्ये मोलिसिसच्या टाक्या फुटल्यामुळे 52% डिस्टिलरी चालली.  असे सांगून नागवडे आणखी पुढे म्हणाले की, कारखान्याचा कारभार अत्यंत काटकसरीने केला जात आहे. पाणी प्रश्नाबाबत बोलताना ते म्हणाले की, कुकडीचे पाणी ओढ्या नाल्यांमध्ये जात आहे तेच पाणी जर घोड मध्ये सोडले असते तर आंदोलन करण्याची वेळ येऊन ठेपली नसती. असे सांगून अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी सभासदांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना समर्पक अशी उत्तरे दिली.
        यावेळी बी आर एस चे नेते घनश्याम शेलार बोलताना म्हणाले की सभासदांनी नेहमी संस्थेच्या हितासाठी बोलावं. संचालक मंडळाने देखील अभ्यासपूर्ण अंमलबजावणी करावी व संस्थेचे हित जोपासावे  आपलीच मातृ संस्था समजून सभासदांनी देखील आपल्याच कारखान्याला ऊस द्यावा, असे सांगून शेलार पुढे म्हणाले की, घोड खालील शेतकरी सदन आहे. शेतकरी मोठ्या संकटात आहे. पाऊस नाही पडला तर गंभीर स्थिती निर्माण होऊ शकते. यासाठी सर्वांना आता एकत्रित लढा द्यावा लागेल असे सांगितले.
        अॅड विठ्ठलराव काकडे यावेळी बोलताना म्हणाले की, सहकार महर्षी बापूंनी या तालुक्याच्या हितासाठी प्रथम घोड पाण्यासाठी संघर्ष केला. तालुक्याला पाणी मिळून दिले. त्यानंतर शेतकऱ्यांना कष्टाचे धाम मिळावे, यासाठी खाजगी कारखाना सहकारी तत्त्वावर उभा केला. त्यामुळे सर्वांचीच प्रगती झाली. ही कामधेन जोपासण्याची आम सभासदांची जबाबदारी आहे. पावसाअभावी पाणी प्रश्न तालुक्यात गंभीर बनला आहे. आवर्तन सुटले तरच शेतकरी आणि साखर कारखानदारी वाचणार आहे. त्यामुळे कुकडी बरोबर घोडला देखील एका आवर्तनची नितांत गरज आहे. उपलब्ध पाण्यातून एक आवर्तन घोड ला मिळू शकते. त्यासाठी सर्वांनीच आता संघटित होण्याची वेळ आहे. असे सांगितले.
       यावेळी केशवराव मगर, बाबासाहेब इथापे, भाऊसाहेब मांडे, संदीप नागवडे, त्रिंबक मुठाळ, सुदाम कुठे, हनुमंत झिटे, श्रीपाद खिस्ती, राजेंद्र भोस, किरण नागवडे,  उत्तमराव नागवडे, साहेबराव जाधव, अॅड बापूसाहेब भोस आदींसह जवळपास 30 सभासदांनी चर्चेत भाग घेऊन मौलिक सूचना मांडल्या. 
    
     या सभेस कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब भोस, दीपक शेठ नागवडे, घनश्याम शेलार, जिजाबापू शिंदे, कैलासराव पाचपुते, केशवराव मगर, प्रेमराज भोईटे, विठ्ठल काकडे, बाबासाहेब इथापे ,धर्मनाथ काकडे, अरुणराव पाचपुते, टिळक भोस, स्मितल वाबळे, लक्ष्मणराव नलगे, गणपतराव काकडे,  आदींसह कारखान्याचे आजी माजी संचालक विविध संस्थांचे पदाधिकारी सभासद कामगार यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
     सूत्रसंचालन नागवडे कारखान्याचे संचालक सुभाषराव शिंदे यांनी केले. आभार संचालक भाऊसाहेब नेटके यांनी मानले.
              
              
वाचक क्रमांक :
                                    
                                    
                                                                   
                                                              
                                                              
                                    
                                        
                                          
                            
              							
							
							
							प्रकाश म्हस्के 
							संपादक 							
 
							
              
                
 
                
                
             		  	 							  
  स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?
      
   
														  
  भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती  
  							  
  श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
  							  
  भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
      
   
														  
  भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
  							  
  कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात. 
  							  
  कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न 
      
   
														  
  त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी 
  							  
  श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला  भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
  							  
  दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
      
   
														  
  निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
  							  
  बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. 
  							  
  लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना. 
      
   
														  
  पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे 
  							  
  पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट 
  							  
  दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
      
   
														  
  लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
  							  
  दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई 
  							  
  श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
      
   
														  
  श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष