छत्रपती कॉलेजमधील ४९ गुणवंत विद्यार्थ्यांचा नोकरीसाठी निवड झाल्याबद्दल भव्य सत्कार!
By : Polticalface Team ,02-09-2023
लिंपणगाव) प्रतिनिधी)-- श्रीगोंदा येथील छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेच्या , छत्रपती शिवाजी महाविद्यालयास नुकतेच ए प्लस मानांकन आणि ४२ विद्यार्थी पोलीस दलात भरती झालेले असतानाच कॉलेजचे प्राचार्य डॉ.सतीशचंद्र सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली कॉलेजच्या प्लेसमेंट सेलच्या माध्यमातून कॅम्पस इंटरव्ह्यू द्वारे आय.सी.आय.सी.आय बँक व फार्मा इंडस्ट्री मध्ये ३७ विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड झाली. करिअर कट्टा उपक्रमांतर्गत पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून राज्य राखीव दल आणि अग्नीवीर मध्ये भारतीय सैन्य दलात १२ विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड झाली.अशा एकूण ४९ विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र (दादा) नागवडे यांच्या हस्ते आणि नागवडे कारखान्याचे संचालक राकेशजी पाचपुते,श्रीनिवास घाडगे यांच्या उपस्थितीत फेटे बांधून, सन्मानचिन्ह व अभिनंदन पत्र देऊन सन्मान करण्यात आला.
कॅम्पस मुलाखतीच्या यशस्विततेसाठी प्लेसमेंट सेलचे चेअरमन प्रा.विलास सुद्रिक यांनी मेहनत घेतली तसेच पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रातील फिजिकल डायरेक्टर प्रा. सतीश चोरमले, प्रा.महेश गिरमकर, प्रा.वैभव सोनवणे, प्रा.स्वप्नील पवार, प्रा.विवेक शेलार व ट्रेनर किरण बंड यांनी मेहनत घेतली.
संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र (दादा) नागवडे यांनी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी न घाबरता संकटांना सामोरे गेले पाहिजे याकरता त्यांनी स्वतःवर अचानपणे आलेल्या प्रसंगांना कसे धाडसाने सामोरे गेलो याचे विविध दाखले दिले आणि विद्यार्थी आणि पालकांना ते खूप भावले. राजेंद्र दादांच्या दूरदृष्टी मुळे अनेक होतकरू विद्यार्थ्यांना रोजगार मिळत आहे, यावरूनच कै. बापूंच्या सारखी दूरदृष्टी दादांच्या ठिकाणी दिसते असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष नागवडे कारखान्याचे संचालक श्रीनिवास घाडगे यांनी व्यक्त केले.
प्रमुख पाहुणे म्हणून राकेशजी पाचपुते उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा.सूरेशजी रसाळ यांनी केले तर उपप्राचार्य प्रा.भगवान सोनवणे यांनी आभार मानले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.शंकर गवते यांनी केले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे जिल्हा बँक संचालिका अनुराधाताई नागवडे, संस्थेचे निरीक्षक सचिनराव लगड, सेक्रेटरी बापुतात्या नागवडे, सर्व विश्वस्थ ,कॉलेजचे प्राचार्य डॉ.सतिशचंद्र सुर्यवंशी व सर्व कर्मचारी वृंदांनी अभिनंदन केले.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी