घोड कालव्याचे आवर्तन व कुकडी कालव्यातून विसापूर धरणात सोडण्याचा कालवा सल्लागार समितीचा निर्णय राजेंद्र दादा नागवडे यांची माहिती
By : Polticalface Team ,02-09-2023
लिंपणगाव( प्रतिनिधी)- घोड कालव्याचे आवर्तन व कुकडी कालव्यातुन विसापूर धरणांत पाणी सोडण्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत झाला असल्याची माहिती सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्रदादा नागवडे यांनी दिली.
पुणे येथे व्ही. व्ही.आय.पी. सर्किट हाऊस येथे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा. सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार बेनके पाटील, आमदार अशोकराव पवार, माजी मंत्री राम शिंदे, आमदार बबनराव पाचपुते, कालवा सल्लागार समितीचे सदस्य भगवानराव पाचपुते तसेच पुणे व अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या समवेत झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीस नागवडे यांनी स्वतः उपस्थित राहून श्रीगोंदा तालुक्यातील पाणी टंचाईची समस्या प्रकर्षाने मांडली. सदर बाबत सकारात्मक निर्णय घेवून उद्यापासुन घोड कालव्याचे २५ दिवसांकरीता आवर्तन सोडण्याचा तसेच कुकडी डाव्या कालव्यातून विसापूर धरणांत पाणी सोडण्याचा महत्वपुर्ण निर्णय झाला असल्याचे नागवडे यांनी सांगितले.
श्रीगोंदा तालुक्यात अद्याप पाऊस न झाल्यामुळे व गेली चार महिन्यांपासुन घोडचे आवर्तन न सुटल्यामुळे तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असुन त्याकरीता घोड कालव्याचे आवर्तन सोडणेकरीता दि. २३ ऑगस्ट रोजी तहसिल कार्यालय श्रीगोंदा येथे जन आंदोलन करणेत आले होते तर सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या दि. ३० ऑगस्ट रोजीच्या वार्षिक सभेत आवर्तन सोडणेकरीता सर्व सभासदांनी एकमुखी मागणी करुन मंत्री महोदयांना तशी विनंती करणेचा ठराव मंजूर केला होता. सदरची परिस्थीती कालवा सल्लागार समितीसमोर विषद करणेत आली. याबाबत सकारात्मक निर्णय होवून पाणी सोडण्याचा निर्णय झाला असल्याने लाभक्षेत्रातील पिकांना जीवदान मिळणार असल्यामुळे शेतकरी बांधवांच्या मनामध्ये समाधानाची भावना निर्माण झाली असल्याचे नागवडे यांनी सांगितले.
वाचक क्रमांक :