अंतरवाली सराटी घटनेचा करमाळ्यात रास्ता रोको करून झाला निषेध
By : Polticalface Team ,03-09-2023
करमाळा प्रतिनिधी जालना तालुक्यातील आंतरवाली सराटी येथील घटनेचा आज करमाळा शहर तालुका सकल मराठा समाज तसेच बहुजन बांधवांच्या वतीने श्रीदेवीचा माळ बायपास चौक येथे रास्ता रोको करून सदर घटनेचा निषेध व्यक्त करीत पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे यांना निवेदन देण्यात आले
आज दुपारी बारा वाजता अहमदनगर टेंभुर्णी या राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या श्रीदेवीचा चौक येथे सकल मराठा समाज तसेच बहुजन समाज बांधवांच्या वतीने आंतरवाली घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला तसेच यावेळी समाज बांधवांच्या वतीने पोलीस निरीक्षक गुंजवटे यांना निवेदन देण्यात आले यावेळी करमाळा शहर तालुक्यातील असंख्य मराठा समाज बांधव तसेच बहुजन समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते
वाचक क्रमांक :